राज्यातील चार हजार अंगणवाड्या ‘स्मार्ट’ होणार, ई-लर्निंगची सुविधा मिळणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागांमधील 3,832 अंगणवाड्यांना ‘स्मार्ट अंगणवाडी’ बनवण्यास सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे अंगणवाड्यांनाही आता ई-लर्निंगची सुविधा पुरवण्यात येणार असून त्याचा लाभ या अंगणवाडय़ांमध्ये शिकणाऱया गरीब विद्यार्थ्यांना होणार आहे.

अंगणवाडी केंद्रांमधून 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांना पोषण, आरोग्य आणि पूर्वप्राथमिक शिक्षण दिले जाते. तसेच गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना पोषण व आरोग्याशी संबंधित सेवा दिल्या जातात. ही केंद्रे अधिक आकर्षक, सुरक्षित आणि आनंददायी व्हावीत, यासाठी ‘स्मार्ट अंगणवाडी’ संकल्पना राबवली जात आहे.

शासकीय जागेत असलेल्या आणि जिथे वीज जोडणी उपलब्ध आहे, अशा अंगणवाडी केंद्रांना ‘स्मार्ट’ बनवले जाणार आहे. त्यांना ई-लर्निंगसाठी लागणारे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर पुरवले जाणार आहे. त्यामुळे लहान मुलांना खेळातून, गाणी, गोष्टी आणि चित्रांमधून शिकणे अधिक सोपे होणार आहे. याशिवाय स्वच्छ भारत किट, वॉटर प्युरिफायर, हात धुण्यासाठी बेसिनची सुविधाही दिली जाणार आहे.

Comments are closed.