हनीट्रॅप प्रकरणात नवा ट्विस्ट, ‘त्या’ महिलेचे ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
महाराष्ट्र हनीट्रॅप: राज्यातील अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि काही माजी मंत्री हनीट्रॅपच्या (Honey Trap) जाळ्यात अडकल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. नाशिकमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन एका महिलेने या सगळ्यांशी शरीरसंबंध ठेवले आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल केले, अशी माहिती समोर आली होती. यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेची चौकशी सुरु केली होती. या महिलेने अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांना जाळ्यात ओढल्याचे सांगितले जात होते. ही महिला मूळची नाशिकमधील (Nashik News) असून ती सध्या ठाण्यात वास्तव्याला आहे. पूर्वी होमगार्डमध्ये असलेल्या या महिलेने हनीट्रॅपच्या माध्यमातून मोठी आर्थिक माया जमावल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे पोलिसांची तिच्याकडे वक्रदृष्टी वळाली होती. त्यामुळे आता या महिलेने करुणा शर्मा मुंडे (Karuna Munde Sharma) यांच्याकडे धाव घेतली आहे. करुणा शर्मा यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत या महिलेची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्रात सध्या महिलांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझ्यासोबत बसलेल्या या महिलेवर दोन पोलीस अधिकाऱ्यांनी बलात्कार केला. तिने तक्रार करायचा प्रयत्न केला तर पोलिसांनी तिच्यावर आणि तिच्या मुलीवर गुन्हा दाखल केला. या महिलेच्या बाजूने कोणीही बोलायला तयार नाही. रक्षकच भक्षक झाले आहेत, असे करुणा शर्मा यांनी म्हटले. यावेळी संबंधित महिलाही पत्रकार परिषदेत उपस्थित होती. या महिलेने प्रसारमाध्यमांना सांगितले की, उत्तम कोळेकर नावाचे एक एसीपी आहेत. त्यांनी माझ्यासोबत ओळख काढली आणि माझा नंबर घेतला. माझ्या सोबत बोलायला सुरुवात केली. मला पोलिस स्टेशनला चहाला बोलवलं. त्यावेळी त्यांच्या बायकोचा देखील फोन आला आणि त्यांचा फोन आला म्हणून मी त्यांच्या घरी गेले. घरी गेल्यावर तेथे त्याची बायको नव्हती तर इंद्रजीत कारले नावाचा एसीपी होता. तिथे या दोघांनी मला गुंगीच औषध देऊन माझ्यावर बलात्कार केला.
Mumbai Crime news: पोलीस अधिकारी बांग्लादेशी महिलांना फ्लॅटवर न्यायचे अन्…
मी यावर कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांकडून माझा जबाब घेण्यात आला. पीआय ढमाळ या महिला पोलीस अधिकाऱ्याने मला शांत बसायला सांगितले. त्यांनी माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला. एसीपीने गुन्हा दाखल केला त्याला इंटरनॅशन कॉल आला आणि तो कॉल माझ्या माध्यमातून झाला, असं त्यांच म्हणणं आहे. त्यांनी माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला. यांनी माझ्यासोबत माझ्या मुलीवरही गुन्हा दाखल केला. याचं म्हणणं आहे की, मी हनीट्रॅप करते. या दोन पोलीस अधिकाऱ्यांनी घाटकोपरला टू बीएचके फ्लॅट घेतला आहे. त्याठिकाणी हे दोघे बांगलादेशी महिलांना घेऊन येतात. तिथे दारुचे बॉक्सही असतात. या फ्लॅटवर हे दोन्ही अधिकारी दारु पितात आणि महिलांना वापरतात, असे संबंधित महिलेने सांगितले. यावर करुणा शर्मा यांनी संबंधित महिलेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ न्याय द्यावा, अशी मागणी केली.
मी तीन महिने महिला आयोगाकडे जात आहे. परंतु, अद्याप महिला आयोगाने काहीच केले नाही. मुख्यमंत्रीसुद्धा महिलांच्या प्रश्नावर आम्हाला वेळ देत नाहीत. 10 ते 12 वेळा मी त्यांच्या पीएच्या माध्यमातून वेळ मागितला, मात्र त्यांनी वेळ दिला नाही, असा आरोपही या महिलेने केला.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.