महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेताच नाही, काय सांगतो नियम?
महाराष्ट्र हिवाळी अधिवेशन : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सोमवारपासून म्हणजेच 8 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. अधिवेशनामुळे संपूर्ण सचिवालयाचे कामकाज मुंबईहून नागपूरला हलवण्यात आले असून, संबंधित विभागांनी बहुतेक तयारी पूर्ण केली आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परिस्थिती उद्भवली आहे की, जिथं दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अधिकृत विरोधी पक्षनेता (Leader of the Opposition – LoP) नाही.
विधानसभा:
नोव्हेंबर 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर, कोणत्याही विरोधी पक्षाला एकूण जागांपैकी किमान 10 टक्के जागा मिळाल्या नाहीत. 288 सदस्यांच्या विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाचा दावा करण्यासाठी किमान 29 आमदार असणे आवश्यक आहे. महाविकास आघाडीतील कोणत्याही घटक पक्षाकडे (काँग्रेस, शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)) स्वतंत्रपणे इतके संख्याबळ नसल्यामुळे, हे पद रिक्त आहे.
विधान परिषद:
विधान परिषदेमध्येही 29 ऑगस्ट 2025 पासून विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे, कारण तेथील नियमांनुसार कोणत्याही विरोधी पक्षाकडे आवश्यक 10 टक्के संख्याबळ नाही. यापूर्वीच्या सहा दशकांच्या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात विधानसभेत नेहमीच विरोधी पक्षनेता होता, परंतु सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे दोन्ही सभागृहांना एकाच वेळी विरोधी पक्षनेता मिळालेला नाही.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशन 7 दिवसात गुंडाळण्यात येणार
नागपूर इथे हिवाळी अधिवेशन हे तीन आठवडे चालणं अपेक्षित होतं. अधिवेशनातून विदर्भाला काय मिळतं याकडंच लक्ष असतं. निवडणुकीचं कारण दाखवून हिवाळी अधिवेशन अवघ्या 7 दिवसात गुंडाळण्यात येणार आहे. एकीकडं राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, दुसरीकडं आचारसंहितेचं कारण दाखवून सरकार या अधिवेशनात कोणतीही घोषणा करू शकत नाही, असं काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. नागपूर करारानुसार विदर्भातील अधिवेशन हे किमान 6 आठवड्यांचं असावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, यंदा हिवाळी अधिवेशनाचा कालावधी आता अवघ्या सहा दिवसांवर आला आहे.
हिवाळी अधिवेशनासाठी विधिमंडळ सचिवालय तसेच मंत्रालयातील विविध विभागातील अधिकारी कर्मचारी नागपुरात दाखल
नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी विधिमंडळ सचिवालय तसेच मंत्रालयातील विविध विभागातील सुमारे 750 अधिकारी, कर्मचारी नागपुरात आले आहेत. त्याशिवाय राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधान परिषद सभापती आणि उपसभापती, विरोधी पक्षनेते दोन्ही सभागृहाचे आमदार, सर्वांचे कार्यालयीन स्टाफ आणि पीए यांची मोठी संख्या अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झाली आहे.
महत्वाच्या बातम्या:
हिवाळी अधिवेशनाचे काम करण्यास नागपुरातील कंत्राटदारांचा सफसेल नकार, गेल्या वर्षीचे पैसे अद्याप थकलेले, कंत्राटदारांचा सार्वजनिक बांधकाम विभागाला अल्टिमेटम
आणखी वाचा
Comments are closed.