अखेर ठरलं! विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकोल्यासह अमरावतीत शिंदेंची सेना आणि भाजप एकत्र लढणार

विदर्भासाठी महायुतीची जागावाटप : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या उपराजधानी नागपूर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम पिचवर भाजपनं नगरपरिषद, नगरपंचायतींसाठीची (Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025) निवडणुकीत दमदार कामगिरी केलीय. अशातच आता साऱ्यांना आगामी महानगर पालिका निवडणुकांचे (नागपूर महानगरपालिका निवडणूक 2025) वेध लागले आहे. त्या अनुषंगाने नागपुरात विदर्भातील युती संदर्भात एक महत्वाचे बैठक पार पडली असून यात अखेर विदर्भात (Vidarbha) महायुतीचे आकार निश्चित झाल्याची माहिती आहे.

विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर आणि अकोला या चारही शहरात भाजप आणि शिवसेना महायुती करत निवडणूक लढवणार आहे. तर चंद्रपूर आणि अकोल्यामध्ये महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा ही समावेश राहणार आहे. मात्र नागपूर आणि अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या बाहेर राहून स्वतंत्र निवडणूक लढवेल, अशी खात्रीलायक माहिती आहे. नागपुरात काएल (गुरुवारी) भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली आणि त्यामध्ये तत्वतः विदर्भातील चारही शहरात भाजप आणि शिवसेनेची युती करण्याचे ठरले आहे.

Mahanagar Palika Election 2025: विदर्भातील चारही शहरात भाजप आणि शिवसेनेची युती निश्चित

दरम्यान, कोणता पक्ष किती जागा लढवेल हे अजून जाहीर करण्यात आलेले नाही. साधारणपणे दोन्ही पक्ष चारही शहरात आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर करेल आणि त्याच्यातूनच कोणता पक्ष किती जागा लढवत आहे, हे स्पष्ट होईल. अशी माहिती शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी दिली. नागपुरात काएल (गुरुवारी) भाजपच्या विदर्भ कार्यालयात दुपारपासूनच भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत अकोला, अमरावती आणि चंद्रपूर मधील भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. दुसऱ्या बाजूला उदय सामंत आणि संजय राठोड यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या नागपूरअमरावती, अकोला आणि चंद्रपूर शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये पार पडली. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी भाजप कार्यालयात येऊन भाजप नेत्यांची भेट घेतली आणि त्यामध्येच दोन्ही पक्ष चारही शहरात महायुती करून निवडणूक लढवतील असे ठरले आहे.

Mahayuti Seat Sharing : महायुतीच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

नागपुरात महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेचा तसेच काही छोट्या घटक पक्षांचा समावेश राहील.

मात्र राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीबाहेर राहून स्वतंत्र निवडणूक लढवेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अमरावतीत भाजप, शिवसेना आणि युवा स्वाभिमान पक्षाची युती होईल.

तिथेही राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल.

अकोला आणि चंद्रपूर मध्ये महायुतीत तिन्ही मित्रपक्षांचा समावेश राहील.

आणखी वाचा

Comments are closed.