अंतरवाली ते आझाद मैदान, मनोज जरांगेंचा प्रवास, 10 ते 10, 48 तासांनी मुंबईत
मनोज जरेंगे पाटील मुंबई मोर्चा: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली हजारो समाजबांधवांचा महामोर्चा 27 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईकडे (Mumbai Morcha) रवाना झाला होता. आज, 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मनोज जरांगे आणि हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. मनोज जरांगे हे अंतरवालीतून 27 ऑगस्टला निघाल्यानंतर शहागड, पैठण, शेवगाव,पांढरीपूल, अहिल्यानगर, नेप्टी नाका मार्गे आळेफाटा, शिवनेरी दर्शन, माळशेज घाट, कल्याण, वाशी, चेंबूर असा प्रवास करत मुंबईतील आझाद मैदानावर ते 29 ऑगस्टला 48 तासांनी दाखल झाले आहेत.
मनोज जरांगेंसह पत्नी आणि मुलीला अश्रू अनावर
मुंबई दौऱ्यावर जाताना मनोज जरांगे यांची त्यांच्या परिवारासोबत भेट झाली होती. यावेळी मनोज जरांगेंसह पत्नी आणि मुलीला अश्रू अनावर झाले. अंकुशनगर येथील मनोज जरांगे यांच्या घराजवळ परिवाराकडून त्यांचं औक्षण करण्यात आले. यावेळी जमलेल्या महिलांनाही अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर मनोज जरांगेंचे ठिकठिकाणी मराठा कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले होते.
किल्ले शिवनेरीवर दर्शन
मनोज जरांगे हे गुरुवारी (दि २८) रोजी सकाळी साडे सातच्या दरम्यान जुन्नर येथे पोहचले. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाजवळ हजारो आंदोलनकर्ते यावेळी उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा जुन्नर शहरात पोहोचल्यावर वनविभागाच्या गेस्ट हाऊसवर काही वेळ विश्रांती घेतली. यानंतर ते किल्ले शिवनेरीवर गेले, त्यानंतर त्यानी गडावरील शिवाई देवीची पूजा केली. ते गडावरील पवित्र माती कपाळी लावून मराठा आरक्षणाच्या लढ्याचा संकल्प केला. या प्रसंगी त्यांच्या समर्थनासाठी हजारो मराठा बांधवांनी किल्ले शिवनेरी परिसरात प्रचंड गर्दी केली होती.
मराठा आंदोलकाचा मृत्यू
मनोज जरांगे पाटील किल्ले शिवनेरीवरून खाली येत असतानाच एक हृदयद्रावक घटना घडली होती. जुन्नरजवळ मराठा आंदोलक सतीश देशमुख यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. मनोज जरांगे पाटील यांनी सतीश देशमुख यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केले होते. यानंतर काही वेळाने सतीश देशमुख यांच्या भावाने मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. मनोज जरांगे यांना पाहताच सतीश देशमुख यांच्या भावाला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले होते.
48 तासांनी मनोज जरांगे मुंबईत दाखल
यानंतर मनोज जरांगे यांचा मोर्चा मोर्चा चाकण, तळेगाव आणि लोणावळा या महत्त्वाच्या ठिकाणांवरून पुढे सरकत थेट वाशी मार्गे मुंबईतील आझाद मैदानावर आज सकाळी 10 वाजता दाखल झाला. जरांगेंसह मराठा कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत पोहोचले आहे. मनोज जरांगे आज मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. या आंदोलनासाठी आझाद मैदानात जय्यत तयारी करण्यात आलीय. मोठा पोलीस बंदोबस्त आझाद मैदान परिसरात तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांना अंतरवाली सराटी ते मुंबई प्रवास करायला 48 तास लागले आहेत. या 48 तासात त्यांनी अनेक राजकीय नेत्यांनी भेट घेतली आहे.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला कुणाकुणाचा पाठिंबा?
राष्ट्रवादी शरद पवार गट
1 उत्तमराव जानकर, आमदार माळशिरस विधानसभा
2 नारायण आबा पाटील, आमदार करमाळा विधानसभा
3 बजरंग सोनवणे खासदार, बीड लोकसभा
4 संदीप क्षीरसागर आमदार, बीड असेंब्ली
राष्ट्रवादी अजित पवार गट
1) विजयसिंह पंडित – आमदार, गेवराई विधानसभा
2) प्रकाश सोळंके – आमदार, माजलगाव विधानसभा
3) राजेश विटेकर – आमदार पाथरी विधानसभा
4) राजू नवघरे – आमदार- वसमत विधानसभा
शिवसेना उद्धव ठाकरे गट
1 ओमराजे निंबाळकर – खासदार, धाराशिव लोकसभा
2 कैलास पाटील – आमदार, धाराशिव-कळंब विधानसभा
3 संजय ऊर्फ बंडू जाधव – खासदार, परभणी लोकसभा
शेतकरी कामगार पक्ष
1 डॉक्टर बाबासाहेब देशमुख, आमदार सांगोला विधानसभा,
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
2. हैदराबाद गझेटियर लागू करा…13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला साताराबाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
3. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या…सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.
4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या…अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या…, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
https://www.youtube.com/watch?v=4trfnlxjcjm
आणखी वाचा
Comments are closed.