फडणवीसच टार्गेट का, सगेसोयरे म्हणजे कोण, मागण्या काय, मुंबईत कधीपर्यंत धडक, चित्रा वाघांवर संता

मनोज जारानरेंज पावेल: 29 ऑगस्टला कोणत्याही परिस्थितीत मुंबईमध्ये आंदोलन करणार असल्याचा निर्धार मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज (25 ऑगस्ट) अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मराठ्यांना सर्व कामधंदे बाजूला ठेवून मुंबईमध्ये येण्याचे आवाहन केलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आज आणि उद्या अशा दोन दिवसांचा अल्टिमेटमही मनोज जरांगे यांनी दिला. तसंच आरक्षण न दिल्यास सरकारही उलथून टाकण्याचा इशाराही मनोज जरांगेंनी दिलाय. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं.

मी सरकारसुद्धा उलथवून टाकू शकतो- मनोज जरांगे

सरसकट गुन्हे मागे घेणार होते. मार खाऊन आमच्यावरच केसेस झाल्या. अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत.त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. तसेच न बसणाऱ्या 29 जाती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ओबीसी आरक्षणात घातल्या. देवेंद्र फडणवीस खुन्नस दाखवत आहेत. आजच्या दिवस प्रेमाने सांगतो…आम्हाला मुंबईला जायचं नाही. तुम्ही आरक्षण दिल्यावर, आम्हाला मुंबईला जायची गरज नाही. तर तु्म्ही आरक्षण न दिल्यास मी सरकारसुद्धा उलथवून टाकू शकतो…मी सोडत नसतो, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला.

दोन महिन्यापूर्वी मी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना फोन केलेला- मनोज जरांगे

अंतरवली सोडल्यावर मी कोणत्याचं मंत्र्याचं ऐकणार नाही. दोन महिन्यापूर्वी मी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता.  मला गरीब मराठ्यांच्या वेदना तुमच्या पुढे मांडायच्या आहेत, तुम्ही अंतरवालीत या, असं मी देवेंद्र फडणवीसांना म्हणालो होतो, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. देवेंद्र फडणवीस लक्ष घालत नसतील तर आडमुठे कोण हे मुंबईकरांनी सांगावे, असं मनोज जरांगे म्हणाले.

राज्यातील सर्व मराठ्यांनी व्यवसाय बंद ठेवा- मनोज जरांगे

राज्यातील सर्व मराठ्यांनी कामधंदे बंद करा..व्यवसाय बंद ठेवा.. नोकरदार यांनी काम बंद करा… मुंबईकडे निघा….जगाच्या पाठीवर या विजयाच्या सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी व्हा, असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं. कोणी शेताचे कारणे सांगू नका…जिथे जिथे टँकर असतील तिथे पाणी टँकर घ्या..समाजातील सर्व डॉक्टरांनी गोळ्या औषध घेऊन या…राजकारण्यांनी त्यांची वाहने द्या, असंही मनोज जरांगेंनी सांगितले.

सगेसोयरे म्हणजे नेमके कोण?, मनोज जरांगेंनी सांगितले-

सगेसोयरे म्हणजे नेमके कोण? याबाबत मनोज जरांगेंनी व्याख्याच सांगितली आहे. सगेसोयरेच्या अधिसूचनेची व्याख्या देखील आम्ही त्या त्या वेळेस सांगितलेली आहे. मी आजही सांगतो परंपरेनुसार पिढ्यापिढ्या पार लग्नाच्या सोयरीक जुळतात ते सोयरे. तर ते का घ्यायचे याचे सुद्धा तीन चार परिच्छेद केलेले आहे. आमचे सांगितलेले शब्द घ्या. प्रत्येक वेळेस तुम्ही ते टाळत आहात. सगेसोयरे का घ्यायचे तर ज्याची कुणबी नोंद सापडली ते सगेसोयरे म्हणून घ्यायचे. 1967 ला ओबीसींना आरक्षण दिले गेले. पोट जात, उपजात म्हणून याच्या आधी 180 च्या आसपास जाती होत्या. मुद्दाम देवेंद्र फडणवीस यांना मी सांगत आहे की, आता आंदोलन खूप पुढे गेलेले आहे. आता आम्ही निघण्याच्या तयारीत आहोत. शेवटचे सांगत आहोत. अजून तुमच्या हातात दोन दिवस आहेत. तुम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले मराठे वेठीस धरू नयेत. कारण तुम्ही सरकार आहात. सरकारने राज्य अस्थिर करू नये. राज्याच्या प्रमुखाला राज्य अस्थिर करण्याचा अधिकार नाही. सरकार आडमुठेपणाच्या भूमिकेत जाणार असेल तर ही देशासाठी आणि राज्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले.

सगेसोयरेला पोटजात, उपजात असे नाव देण्यात आले- मनोज जरांगे

ज्याची कुणबी नोंद निघाली, ते सगळे सगेसोयरे म्हणून पोटजात, उपजात म्हणून घ्या. या अगोदर 1967 ला 180 जाती होत्या. त्यावेळेस ओबीसी समाजाचे सगेसोयरे तुम्ही आरक्षणात घेतले ते आमच्या भाषेत सगळे सोयरेच आहेत. त्याला फक्त तुम्ही कायदेशीर नाव चेंज केले आहेत. पहिल्यांदा 180 जाती होत्या. आता साडेतीनशे ते चारशे जाती झालेल्या आहेत. सोयीनुसार सगेसोयरे आरक्षणात घेतले आहेत. फक्त त्यांचे नाव बदलले आहे. सगेसोयरेला पोटजात, उपजात असे नाव देण्यात आले. त्यांनी त्यावेळेस फक्त सगेसोयरे शब्द वापरला नाही. तसंच ज्यांची कुणबी नोंद सापडली मग मराठ्याची पोटजात कुणबी होत नाही का फडणवीस साहेब? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

शिंदे समितीने 58 लाख कुणबी नोंदी दिल्या-

मुंबईत आंदोलनाचा निर्धार कायम ठेवत मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही पद्धतीने ट्रॅफिक जाम होऊ नये यासाठी कोणताही एका मार्गाने आझाद मैदानात जाण्यासाठी मार्ग देण्याची विनंती केली. शिंदे समितीचा दाखला देत म्हणून जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. सरकारकडूनच नेमण्यात आलेल्या शिंदे समितीकडून 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या होत्या. समिती सुद्धा तुमचीच होती. समितीचा अहवाल सुद्धा स्वीकारण्यात आला, तर मग आडमुठे कोण? अशी विचारणा मनोज जरांगे पाटील यांनी केली.

कुणबी आणि मराठा एकच- मनोज जरांगे

कुणबी आणि मराठा एकच आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. हैदराबाद गॅझेट लागू करा अशी त्यांनी मागणी केली. गेल्या 13 महिन्यांपासून अभ्यास सुरू असल्याचा टोला जरांगे यांनी लगावला. ते म्हणाले की आम्हाला सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करावं. सरकारने मराठ्यांचा विषय समजून घेतला पाहिजे. आमची ही आमची जमीन आहे हे आम्हाला भक्कम माहीत असल्याचं मनोज जरांगे म्हणाले.

10 टक्के आरक्षण कधीही जाऊ शकतं- मनोज जरांगे

सरकारकडून देण्यात आलेलं 10 टक्के आरक्षण कधीही जाऊ शकतं. आम्हाला आमच्या हक्काची जमीन द्या, भाड्याने घर देऊ नका अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. ते म्हणाले की दीडशे वर्षांपूर्वी आमच्या नोंदी आहेत, पण सग्यासोयऱ्यांचा आदेश काढून दीड वर्ष झाली तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. मराठा अजूनही संयमी आहे, त्याची व्याख्या देण्यात आली आहे. ज्यांची कुणबी नोंद आहे त्या सगेसोयरे दाखले द्या, आता आंदोलन खूप पुढे गेला असून राज्य अस्थिर करू नका असा आवाहन जरांगे पाटील यांनी केलं. मराठ्यांची कुणबी पोट जात होत नाही का? अशी विचारणा मनोज जरांगेंनी केली.

मनोज जरांगें चित्रा वाघा यांच्यावर संतापले-

मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आईला शिवी दिली, असे चित्रा वाघ यांनी म्हटले होते. याबाबत मनोज जरांगे यांना विचारले असता त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर सडकून टीका केली. तू माझ्या नादी लागू नकोस. माझ्या नादी लागलीस तर तुझं सगळं गबाळ उचकीन. संध्याकाळपर्यंत तुझी सगळी माहिती माझ्याकडे येईल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. ती जी बाई बोलली, कोण वाघीण तिला आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तेव्हा दिसलं नाही का? तेव्हा तू कुठे मे%$, आमच्या तीन-चार वर्षांच्या पोरी रक्ताच्या थारोळ्यात पडली तेव्हा तू झोपली होतीस का? तेव्हा तुला कोणी दिसलं नाही का, तेव्हा तू कुठे गेली होती? आता तुझी जात जागी झाली. कवर तू खेटरं चाटतेस, माझ्या नादी तू लागू नकोस. तू बाई असशील तर आमच्याकडेही बाया आहेत. आमच्या आईवर 307 ची केस लागली, तुझ्यावर तशी केस केली तर चालेल का?, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला. यावर आता चित्रा वाघ काय प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)

1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.

2. हैदराबाद गझेटियर लागू करा… 13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला साताराबाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

3. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या…सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.

4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या…अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या…, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मार्ग कसा असणार? (What will be the road map of Manoj Jarange movement?)

– अंतरवालीवरून 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता निघणार…

– अंतरवाली – पैठण -शेवगाव (अहिल्यानगर)..कल्याण फाटा -आळे फाटा, शिवनेरी (जुन्नर मुक्कामी..)

– 28 ऑगस्टला खेड मार्गे चाकण, लोणावळा, वाशी चेंबूर…28 ऑगस्ट रोजी रात्री आझाद मैदानावर पोहचणार.

– 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर आंदोलन करणार…

मनोज जरांगेंची संपूर्ण पत्रकार परिषद, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=lwkfommzhnc

संबंधित बातमी:

Manoj Jarange On Devendra Fadnavis: मी स्वत: देवेंद्र फडणवीसांना फोन केलेला; नेमकं काय बोलणं झालेलं?, मनोज जरांगेंनी सगळं सांगितलं!

Comments are closed.