महादेव मुंडे प्रकरणातील आरोपींना फासावर लटकवल्याशिवाय सुट्टी नाही, कुणाला वाचवलं तर गृहमंत्र्या

महादेव मुंडे प्रकरणात मनोज जारानरेंज पाटील: एकीकडे शनिवारी सर्वत्र राखी पौर्णिमेचा उत्सव पाहायला मिळत असताना महादेव मुंडे खून प्रकरणात (Mahadev Munde Case) न्यायाच्या लढाईत साथ देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना राखी बांधण्यासाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी थेट अहिल्यानगरमध्ये दाखल झाल्या. त्यांनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांना राखी बांधली. यानंतर महादेव मुंडे कुटुंबीय आणि जरांगे पाटील यांची बंद दाराआड चर्चा झाली.याआधी महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास व्हावा यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे (Dnyaneshwari Munde) यांनी जरांगे पाटील यांना मदतीचे आवाहन केले होते. त्या आव्हानाला प्रतिसाद देत जरांगे पाटील यांनी थेट परळी मध्ये येऊन ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेतली होती. त्यानंतर आता या प्रकरणाचा तपास मुख्यमंत्र्यांनी नियुक्त केलेल्या एसआयटीमार्फत केला जात आहे. आता या प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना थेट इशारा दिलाय.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ताई वेगळ्या दुःखात आहेत. त्यांना न्याय देणं हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. शेवटी तिचे पोरं उघड्यावरती पडले आहेत. सुखी चाललेला संसार वनवासी करण्याचे काम ज्या लोकांनी केले त्याला आम्ही फासावर लटकवणार आहे. कारण सोन्यासारखे लेकरं, सुखी  चाललेला संसार, त्यांच्या घरावरून उभा नांगर या लोकांनी फिरवला. त्यामुळे त्यांना फासावर घातल्याशिवाय सुट्टी नाही. त्या तपासात कुमावत साहेब आहेत. त्यामुळे आरोपी पाताळात जरी लपले, ते मंत्र्याचे असो खासदाराचे, आमदाराचे असो की कोणाचा पण असू द्या, पंकज कुमावत साहेब त्याला पाताळातून धरून आणणार आहेत आणि फासावरच लटकवणारच आहेत. ज्ञानेश्वरी ताई यांच्या पाठीशी आम्ही सगळे आहोत, असे त्यांनी म्हटले.

पंकज कुमावत ग्रेट माणूस

महादेव मुंडे प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. याबाबत विचारले मनोज जरांगे पाटील म्हणाले की, तपास कुमावत साहेब करत आहेत. त्यांची एसआयटी गठीत होऊन दोन-चारच दिवस झाले आहेत. आपण त्यांना वेळ दिला पाहिजे. त्यांना डिस्टर्ब होईल. त्यामुळे आपण सध्या हस्तक्षेप करू नये. त्यांना थोडे प्रयत्न करू द्या. त्यांना आरोपीपर्यंत जाऊ द्या. 29 ऑगस्टला मी सुद्धा मोकळा होत आहे. बीड जिल्हा उद्या सकाळी सुद्धा बंद करायचं म्हटलं तरी बीड जिल्ह्यातल्या मराठा आणि सर्व जाती धर्माचे लोक सज्ज आहेत. परंतु, त्यांच्या तपासात अडथळा निर्माण केल्यासारखे होईल, त्यामुळे आपण विश्वास ठेवू. मी कुणाचीही स्तुती करत नाही. पण, पंकज कुमावत हे ग्रेट माणूस आहेत. ते म्हणणार नाही की हे मंत्र्याचा पोरगं आहे की गुंडाचं पोरगं आहे. कुमावत हे गुंडाला खेटणारे आहेत.गुंडाशी चॅलेंज स्वीकारणे हे पंकज कुमावत यांना आवडते. त्यामुळे कसलाही गुंड असला तरी ते त्याला आतमध्ये टाकतीलच, असे म्हणत त्यांनी पंकज कुमावत यांची स्तुती केली.

तर गृहमंत्र्यांच्या तोंडाला काळं लागणार

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, आता सगळ्यांची जबाब घेतले जातील. ज्ञानेश्वरी ताई यांचा जबाब घेतला जाईल. ज्ञानेश्वरी ताई जे नाव सांगतील ते पंकज कुमावत साहेबांना अटक करावे लागणार आहेत. बीडच्या एसपींना अटक करावे लागणार आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना सुद्धा अटक करावेच लागणार आहेत. जर गृहमंत्र्यांनी अटक केली नाही जाणूनबुजून जवळचा नेत्याचा कुणीतरी कार्यकर्ता आहे किंवा नेताच यात आहे, म्हणून जर टाळायचा प्रयत्न केला तर गृहमंत्र्यांच्या तोंडाला काळं लागणार आहे, असा थेट इशारा त्यांनी यावेळी दिला.

मनोज जरांगेंचं मुंबईतील मोर्चाबाबत महत्त्वाचं वक्तव्य

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी पश्चिम महाराष्ट्रात बैठका घेत असलेले मनोज जरांगे हे काल रात्री अहिल्यानगरमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी 29 ऑगस्टला मुंबईकडे जाणाऱ्या मोर्चासाठी महाराष्ट्रातून प्रत्येक घरातून एक गाडी जाणार असल्याचं सांगितलं. एबीपी माझाच्या माध्यमातून सांगतो, आता नाही तर कधीच नाही, ही शेवटची संधी आहे, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

https://www.youtube.com/watch?v=zhvgdxxva3y

आणखी वाचा

Beed Crime: वाल्मिक कराड गँगने दमदाटी केलेला व्हायरल व्हिडिओ कधीचा? आरोपी नेमका कोण? मोठी अपडेट समोर

आणखी वाचा

Comments are closed.