ठाकरे-शिंदे एकत्र येणार? सामंत म्हणाले ज्या गावाला जायचंच नाही त्या गावचा पत्ता विचारायचा कशाला

उदय समंत: ज्या गावाला जायचंच नाही, त्या गावचा पत्ता विचारायचाच कशाला, असे वक्तव्य मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केलं. प्रसारमाध्यमांनी त्यांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (मराठी) एकत्र येणार का? असा सवाल केला होता. यावेळी ते बोलत होते. त्यांनी आमच्यावर खूप टीका केली आहे, आता एकत्र नाही असंही सामंत म्हणाले. तसेच संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर मी ग्रंथ लिहणार असल्याचेही सामंत म्हणाले.

मंत्री नसतो, तर मी देखील आंदोलने केली असती

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जमिनीबद्दल उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर देखील उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. आमच्या जमिनी घ्या आणि MIDC करा असे म्हणणारे लोक देखील आहेत. मनसेने मराठी लोकांसाठी केलेलं आंदोलने योग्य आहे. मी सत्तेत नसतो, मंत्री नसतो, तर मी देखील अशीच आंदोलने केली असती असेही सामंत म्हणाले. मी सध्या समाधानी आहे. मला पालकमंत्रीपद मिळालय. दोन जिल्ह्यांचा प्रश्न आहे, लवकरच निर्णय होईल, तुम्हाला जास्त ब्रेकिंग मिळणार नाहीत असेही सामंत म्हणाले. दरम्यान, ठाकरे-शिंदे एकत्र येणार अशी चर्चा सुरु आहे, यावर प्रसारमाध्यमांशी उदय सामंत यांना विचारले असता त्यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे, आता एकत्र नाही असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे.

पुढचं संमेलन कुसुमाग्रजांच्या नाशिकमध्ये होणार

पुणेकर आणि पुण्याच्या संस्थाचेही मी आभार मानतो. हे संमेलन यशस्वी झालं आहे. साहित्यातले सगळे घटक यात सहभागी झाल्याचे सामंत म्हणाले. परदेशात संमेलन करण्यासाठी सगळ्यांनी परवानगी दिली आहे. पुढचं संमेलन कुसुमाग्रजांच्या नाशिकमध्ये होईल असी घोषणा देखील सामंत यांनी केलं. टीका झालीच पाहिजे तरच यशस्वी झालं असं म्हणता येईल. मराठी उद्योजकाला देखील पायावर उभा राहता आलं पाहिजे असे सामंत म्हणाले. परदेशातले उद्योजक देखील आले होते. मराठी भाषेचं संवर्धन झालं पाहिजे हाच हेतू आहे. मराठी शाळांसाठी प्रत्येक जिल्ह्याने 5 टक्के निधी राखून ठेवता येणार आहे.  मराठी भाषिकांना त्रास देणाऱ्यासाठी कडक कायदा होणार असल्याचेही सामंत म्हणाले. सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे, असे प्रकार करणाऱ्यांना कडक कारवाई करणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं. मिशन न राबवता कोणी एकत्र असेल तर त्याच स्वागत आहे असे सामंत म्हणाले.

अधिक पाहा..

Comments are closed.