आमदार रवी राणांच्या भविष्यवाणीनं भुवया उंचावल्या! म्हणाले, पंधरा दिवसात दोन्ही राष्ट्रवादी…

राष्ट्रवादी विलीनीकरणावर रवी राणा : राजकारणामध्ये अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झाल्या आहे. त्यामुळे येणाऱ्या पंधरा दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र (NCP Merger) येतील. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि शरद पवार (शरद पवार) यांचे पार्टी एकत्र येतील. दिल्ली आणि केंद्रामध्ये सुप्रिया सुळे (सुप्रिया सुळे) मंत्री बनतील. तर राज्याची सूत्र सुनेत्रा पवार यांच्या हाती असतील. असा दावा आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केला आहे. ते अमरावतीत बोलत होते. दरम्यान, पुढे सांगायचंf झालं तर राजकारणात काही जरी असलं तरी सर्व काही शक्य आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे मंत्री बनतील. आणि सुनेत्रा पवार राज्य बघतील, येत्या पंधरा दिवसात हे चित्र आपल्याला दिसेल, असेही ते म्हणाले.

Uddhav Thackeray and मराठी: ….तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेहे एकत्र आलेघ्या दिसतील

उद्धव ठाकरे यांनी देखील आता हातात रामरक्षा घेतली आहे. गेल्या काळात त्यांनी हनुमान चालीसाचा विरोध केल्यामुळे मुख्यमंत्री पद गेलंआमदार गेले, खासदार गेले. पण गेल्या काही दिवसाआधी त्यांनी मुंबईमध्ये हनुमान चालीसा वाचली, तर आता राम रक्षा वाचण्यासाठी ते नागपूरच्या राम मंदिरामध्ये 18 तारखेला येत आहे. त्यांना माझं इतकंच सांगणं आहे ते, त्यांनी रेशीमबाग येथे जाऊन डॉ. हेडगेवारांच्या स्मारकाला वंदन करून यावं. तसेच अमरावतीच्या हनुमान गाडीवर येऊन हनुमान चालीसाचे वाचन करा. मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये, काही महिन्यामध्येf आपल्याला हे सुद्धा चित्र बघायला मिळेल ते उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आलेलं दिसेल. कारण उद्धव ठाकरे यांनी हनुमनाहीतानाही स्वीकारलं आहे. राम भगवान आणि त्यांच्या विचाराला स्वीकारलेएल आहे. उद्धव ठाकरे वापस आलेल्या म्हणून हे अध्यक्ष ठाकरे आणि राम भगवंताच्या विचाराला स्वीकारला आहे.

Sharad Pawar: सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शाळेला शरद पवार आणि प्रतिभा पवार यांनी दिली भेट

बारामतीला जात असताना सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शाळेला शरद पवार आणि प्रतिभा पवार यांनी भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आणि त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती शरद पवारांनी घेतली. याबाबत बोलताना पवार यांनी प्रतिक्रिया दिली की, आज एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा, कौशल्यांचा आणि सर्जनशीलतेचा विकास व्हावा यासाठी अभ्यासक्रमाबरोबरच विविधांगी उपक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत. विशेष म्हणजे, या उपक्रमांमध्ये विद्यार्थिनींचा सहभाग आणि नेतृत्व उल्लेखनीय आहे. बदलत्या जगातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेली विचारक्षमता, सृजनशीलता आणि आत्मविश्वास यांची जडणघडण विद्या प्रतिष्ठानमध्ये होताना दिसते. विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षकवृंद यांना भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.