ठाकरे बंधूंविरोधात गरळ ओकणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढणार? मनसे आता थेट कोर्ट

निशिकांत दुबे: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदीच्या मुद्द्यावरुन रान पेटलं आहे. याचदरम्यान, भाजप खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सातत्याने टार्गेट केल्याचे पाहायला मिळालं आहे. आपल्या घरात कोणीही सिंह असतो. तुमच्यात हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तरप्रदेशात या, तुम्हाला दाखवून देऊ…महाराष्ट्र बाहेर या, तुम्हाला पटकून पटकून मारु, असं निशिकांत दुबे म्हणाले होते. निशिकांत दुबेंच्या या विधानावरुन राज ठाकरेंनी देखील प्रतिआव्हान दिलं आहे. दुबे..तुम मुंबई में आ जावो…मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे…, असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांना प्रत्युत्तर दिलं होतं. यानंतर आता मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

मराठी माणसाबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. 14 जुलै रोजी कोंबडे यांनी पत्रकार परिषदेत “निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्रातील मराठी जनतेची माफी मागावी”, अशी स्पष्ट मागणी केली होती.

निशिकांत दुबे नाशिकला आल्यानंतर त्यांना धडा शिकविणार

त्यानंतरही दुबे यांनी कोणताही माफीनामा सादर केला नाही, त्यामुळे हा मुद्दा न्यायालयात नेण्यात आला आहे. या वादामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी-अमराठी वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर “निशिकांत दुबे नाशिकला आले, तर त्यांना धडा शिकवू,” असा इशारा सुदाम कोंबडे यांनी दिला आहे.

मनसे स्टाईल धडा शिकवावाच लागणार

सुदाम कोंबडे म्हणाले की, भाजपाचे मुजोर खासदार निशिकांत दुबे यांना आम्ही पंधरा दिवसांपूर्वी नोटीस दिली होती. त्या नोटिसीत म्हटलं होतं की, तुम्ही मराठी भाषेबाबत बोलताय, आदरणीय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलत आहात, मराठी माणसांबाबत बोलत आहे. तुम्ही माफी मागा. परंतु, भाजपा खासदारांनी कुठल्याही प्रकारची माफी मागितली नाही. त्यामुळे आता त्यांना मनसे स्टाईल धडा शिकवावाच लागणार आहे. त्यामुळे आम्ही सत्र न्यायालयात त्यांची विरोधात याचिका दाखल केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

https://www.youtube.com/watch?v=A__PPZ6N0JW

आणखी वाचा

राजतारय वर प्रका समजन: दिन तुंबर, बटाओ कहान … मी झारखंडल्लाही म्हणून आलो आहे; मानसे थेट आव्हानात थेट आव्हान देईल

आणखी वाचा

Comments are closed.