मनसेनं स्वीकृत नगरसेवक निवडीवरुन ठाकरेंना डिवचलं; कोत्या मनाचे म्हणत टोला, मुंबईत युतीत वादंग?

मुंबई : राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई (BMC) महापालिकेत भाजप महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत ठाकरेंच्या ताब्यातील सत्ता काबिज केली. त्यामुळे, मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर विराजमान झाला असून नगरसेवक रितू तावडे यांनी पदाभारही स्वीकारला. त्यानंतर, आता स्थायी समिती आणि इतर समित्यांवरील सभापतींच्या निवडी होत आहेत. दुसरीकडे स्वीकृत नगरसेवकपदासांठीही हालचाली सुरू झाल्या असून मनसे (मनसे) एका स्वीकृत नगरसेवकपदासाठी आग्रही असल्याचे समजते. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेकडून (Shivsena) तीन नगरसेवकांची नावे ठरल्याची माहिती आहे. त्यावरुन, मनसेच्या संदीप देशपांडे यांनी व्हॉट्सअप स्टेटसद्वारे टोला लगावला.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्त्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांचाही मुद्दा चर्चेत आहे. मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पद मिळावे म्हणून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे पक्षातील नेत्यांची चर्चा होत आहे. पण ठाकरे सेनेकडून उत्तरच नाही, अशी माहिती मनसेच्या वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली.  त्यामुळे, ठाकरे-मनसे युतीत स्वीकृत नगरसेवक पदावरून दावे-प्रतिदावे सुरू असल्याचं दिसून येतं. ठाकरे- मनसे युतीत तीन पैकी एक स्वीकृत नगरसेवक मनसे ला मिळावा यासाठी आग्रह होता. याबाबत मनसे नेत्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून प्रस्ताव ही दिला होताय. त्यावर, प्रस्ताव पक्षप्रमुखांना सांगून कळवतो, असे  मनसे नेत्यांना सांगण्यात आले. पण कोणतेही उत्तर स्वीकृत नगरसेवकाच्या प्रस्तावाबाबत देण्यात न आल्याची माहिती मनसे पक्षातील सूत्रांनी दिली. त्यातच, आता शिवसेनेच्या या भूमिकेला टोला लगावत संदीप देशपांडे यांनी व्हॉट्सअप स्टेटसवरुन शिवसेनेला डिवचलं आहे.

कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये, असे स्टेटस मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ठेवलं आहे. संदीप देशपांडे यांनी थेट नाव न घेता शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लक्ष्य केल्याने पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना पक्षातील अंतर वाढत चाललं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

25 फेब्रुवारीला स्वीकृत नगरसेवकांची निवड

दरम्यान, येत्या 25 फेब्रुवारीला स्वीकृत नगरसेवकांची नावे घोषित केली जातील. त्यामुळे युतीत लढलेल्या मनसेला सध्या तरी स्वीकृत नगरसेवक देण्यासंदर्भात कुठलाही विचार ठाकरेंच्या शिवसेनेने केला नसल्याचे चित्र आहे. याच मुद्द्यावर मनसेचे मुंबईशहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेऊन नाराजीचा सुर मांडला.

हेही वाचा

Bhiwandi Mayor: दूधविक्रेता ते बांधकाम व्यावसायिक, भिवंडीत भाजपला धक्का देणारे महापौर नारायण चौधरी कोण?

आणखी वाचा

Comments are closed.