मोठी बातमी! अनगरच्या निवडणुकीला स्थगिती पण राजन पाटलांना धक्का नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्ण
सोलापूर : जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत निवडणूक (Election) बिनविरोध झाल्याने राज्यभरात या निवडणुकीची चर्चा रंगली होती. तर, येथील माजी आमदार राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी विजयी जल्लोष करताना थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव घेऊन चॅलेंज केले. त्यामुळे, येथील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. त्यातच, भाजप उमेदवार प्राजक्ता पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवलेल्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयानेही त्यांचा अर्ज फेटाळल्याने ही जागा बिनविरोध झाली आहे. त्यातच, आता सोलापूल जिल्हाधिकाऱ्यांनी अंगार नगरपंचायतीची निवडणूक स्थगित केल्याने येथे फेरनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. मात्र, ह्या स्थगितीचा भाजप नेते राजन पाटलांना आणि बिनविरोध निवड झालेल्या कुठलाही धक्का बसणार नाही. कारण, केवळ येथील बिनविरोध निवडणुकीची औपचारीक घोषणा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे.
सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. आता सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही होणार आहे. याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश जारी केले आहेत. अनगरसह जिल्ह्यातील 6 नगरपालिकेतील 6 प्रभाग आणि 2 नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राजन पाटील यांच्या विरोधात उमेदवार उभा केल्याने येथील दहशतीची राज्यभर मोठी चर्चा झाली होती. आता या निवडीला स्थगिती देण्यात आली असून सुधारित कार्यक्रमानुसार येथे पुढील कार्यवाही होणार आहे. त्यामुळे अनगर नगरपंचायतीची निवडणूक कधी होईल, याबाबत आज सविस्तर स्पष्टता येईल.
स्थगितीचा राजन पाटील यांना धक्का नाही
जिल्हाधिकाऱ्यांच्या स्थगिती आदेशामुळे राजन पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात असून आता नव्याने येथे उमेदवारी अर्ज दाखल करता येणार का, नव्या उमेदवारांना संधी मिळणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. तसेच, सोलापूर सत्र न्यायालयानेही त्यांचा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे, पुढील निवडणूक प्रक्रियेत त्यांना अर्ज दाखल करता येणार नाही, याशिवाय ज्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत, अथवा ज्यांचे अर्ज बाद झाले आहेत, त्यांनीही सुधारित निवडणुकीत अर्ज दाखल करता येणार नाहीत. त्यामुळे, येथील बिनविरोध निवडणुकीची औपचारीक घोषणाच केवळ पुढे ढकलल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे, राजन पाटील किंवा अनगर नगरपंचायतीमधील नगराध्यक्ष व 18 सदस्यांना हा धक्का म्हणता येणार नाही.
दरम्यान, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा नगरपालिका आणि अनगर नगरपंचायत नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी निवड प्रक्रियेला स्थगिती आदेश दिले असून आता सुधारित कार्यक्रमानुसार येथील निवडणूक प्रक्रिया घेतली जाईल, असे आदेशात म्हटले आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.