निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या प्रदूषण पातळीच्या मुद्दयांवर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा झाली. महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजादरम्यान  पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी सभागृहाला माहिती दिली की, चंद्रपूरमधील पर्यावरणविषयक गंभीर समस्या सोडवण्यासाठी त्यांनी वारंवार बैठकांचे आयोजन केले होते. मात्र, एमपीसीबीचे काही वरिष्ठ अधिकारी या बैठकांना सातत्याने अनुपस्थित राहिले. यावेळी मंत्री पंकजा मुंडेंni सांगितलं ते, माझ्या आदेशानंतरही आयएएस (IAS) अधिकारी एम. देवेंद्र सिंग हे ब्रीफिंगसाठी हजर राहिले नाही. या गंभीर विषयाची दखल घेत अखेर त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. याप्रकरणी, तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी निलंबनाचे आदेश दिले होते. त्यानुसार, सामान्य प्रशासन विभागाकडून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. अशातच या कारवाई संदर्भात एक महत्वाचे बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंद्र सिंग आणि सहसंचालक सतीश पडवळ यांच्या निलंबन मागे घेण्याची शक्यता आहे.

Chandrakant Patil : निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी

अर्थसंकल्पीय अधिवेशनातं बोलताना भाजपचे जेष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विधानसभेत एमपीसीबीचे अधिकारी एम देवेंद्र सिंग यांच्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. आयएएस (IAS) अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांनी पुरावे सादर करत घडलेल्या प्रकारबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहहात दिली. यावर विधानसभा अध्यक्ष म्हणाले की, हे निलंबन मागे घेण्याच्या संदर्भात कार्यवाही करावी. अशातच यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या संदर्भात कार्यवाही केली जाईल. त्यामुळे आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंद्र सिंग यांचे निलंबन मागे घेण्याची शक्यता आहे.

निलंबनाच्या कारवाईला ब्रेक लागणार?

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंद्र सिंग आणि सहसंचालक सतीश पडवळ यांना पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीला वारंवार अनुपस्थित राहिल्याबद्दल विधानसभा अध्यक्षांच्या आदेशावरून निलंबित करण्यात आले आहे. विधानसभेतील चर्चेदरम्यान मंत्री पंकजा मुंडे यांच्या ब्रीफिंगसाठी बोलाविण्यात आल्यानंतरही एम. देवेंद्र सिंग उपस्थित राहिले नव्हते. एम. देवेंद्र सिंग हे 2011 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून सध्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव आहेत. त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित होती. त्यानुसार, त्यांचे निलंबन करण्यात आल्याचे संबंधित आदेशात म्हटले होते. अतिरिक्त सचिव व्ही. राधा यांच्या सहीने ही कारवाई करण्यात आली होती.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.