ठाकरेंच्या निशाण्यावरील अण्णामलाईची मुंबईतील भाजप आमदाराकडून पाठराखण; म्हणाले, ते IPS होते..
मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांपैकी मुंबईबाई). महापालिकेकडे राज्याचं लक्ष लागले असून देशभरातली भाजप नेत्यांकडूनही मुंबई महापालिका जिंकण्यासाठी निवडणुकीत प्रचार केला जाता आहे. मुंबई महाराष्ट्राची आहे, मराठी जनांची आहे, पण मुंबईत विविध राज्य आणि प्रांतातील लोक मोठ्या संख्येने राहतात. त्यामुळेच, मुंबईत उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय नेतेही आमदार बनले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील भाजप नेते अन्नम यांना (अन्नमलाई) मुंबईत प्रचारासाठी आल्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्याने चांगलाच वाद निर्माण झाला आहे. ठाकरे बंधूंनी आपल्या शिवाजी पार्कवरील सभेतूनही अण्णामलाईला थेट इशारा दिला. आता, मुंबईतील भाजप आमदार तमिळ सेल्वन हे अण्णामलाईच्या समर्थनार्थ उतरले आहेत.
मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरुन ठाकरे बंधूंसह आमदार आदित्य ठाकरेंनीही अण्णामलाईंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. त्यानंतर, आता, मुंबईतील तमिळ नेते आणि भाजप आमदार तमिळ सेल्व्हन यांनी अण्णामलाईंची पाठराखण केली असून ठाकरेंविरुद्ध तक्रार करणार असल्याचे म्हटले. तसेच, अन्नम यांना हे आयपीएस अधिकारी होते, ते राजीनामा देऊन राजकारणात आल्याचंही त्यांनी सांगितलं. अन्नामलाई हे आयपीएस अधिकारी होते, तामिळनाडूचे भाजप अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले असून ज्येष्ठ नेते आहेत. मात्र, त्यांच्या बाबतीत राज ठाकरेंनी अशाप्रकारे वक्तव्य केले, त्याचा निषेध करतो, असे आमदार तमिळ सेल्व्हन यांनी म्हटलं. मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे, मुंबईचा जो विकास झाला, ते अन्नम यांना सांगत होते. मात्र, ठाकरे हे राजकारण म्हणून शिव्या देत आहेत. मुंबईत 13 टक्के दक्षिण भारतीय आहेत, त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांबाबत असे बोलणे योग्य नाही, असेही सेव्हन यांनी म्हटले.
माझ्या विधानसभेत 90 हजार दक्षिण भारतीय लोक आहेत, मी प्रत्येक भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावरकर यांचे नाव घेतो, मराठी लोकांचे काम करतो. दत्ता केळुसकर हा मराठी विभागात आहे, महाराष्ट्रात मी काम करत आहे. सिंघम मराठी म्हणून कविता आमच्या नेत्यांनी बोलली आहे, ब्रिटिश काळातही सावरकर, टिळक यांना तमिळनाडूमधून मदत केली, अशी आठवण सेल्व्हन यांनी सांगितली. तामिळनाडू आणि मराठी यांचे संबंध शेकडो वर्षांपासून आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे संबंध तंजावरमध्ये आहेत. आम्ही मराठीचा सन्मान करतो, तमिळ समाज प्रत्येक ठिकाणी सेवा करत आहेत. व्यवसाय करत आहेत, महाराष्ट्रात आयपीएस व आयएएस म्हणून काम करत आहेत.
मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर कारवाई करावी
ठाकरेंनी अर्धा उत्तर भारतीय समाजाविरुद्ध बोलले, आता दक्षिण भारतीयांविरुद्ध बोलत आहेत. मात्र, बोलू नये, मी याचा निषेध व्यक्त करतो. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कारवाई करावी म्हणून मी मागणी करतो, असेही सेल्व्हन यांनी म्हटले. दक्षिण भारतीय महाराष्ट्रात येतात तेव्हा भाषेत फरक पडतो, मुंबईच्या आर्थिक राजधानीवर अन्नम यांना बोलले, नवीन नवीन हिंदी ते बोलत आहेत, असे म्हणत सेल्व्हन यांनी अण्णामलाईंची पाठराखण केली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, ती महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकत नाही. कुणीही बोलले तरी काही होत नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबई शहर होतेय, मुंबई ही महाराष्ट्र व हिंदुस्तानातच राहणार आहे. मात्र, बॉम्बे म्हणायची जुनी सवय आहे, आम्ही मुंबई म्हणतो, असेही सेव्हल यांनी स्पष्ट केले.
काय म्हणाले होते अण्णामलाई
अण्णामलाई यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले होते, “मोदीजी हे केंद्रामध्ये आहेत, देवेंद्रजी राज्यामध्ये आहेत आणि मुंबईमध्ये भाजपचा महापौर असेल. कारण, मुंबई हे महाराष्ट्राचे शहर नाही, ते आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराचे बजेट हे 75 हजार कोटी रुपये इतके आहे. चेन्नईचे बजेट हे 8 हजार कोटी तर बंगळुरुचे बजेट हे 19 हजार कोटी रुपयांचे बजेट आहे. त्यामुळे मुंबईचे व्यवस्थापन करण्यासाठी तुम्हाला चांगले लोक प्रशासनात बसवावी लागतील, असे अण्णामलाई यांनी म्हटलं होतं.
हेही वाचा
अकोल्यात भाजप-एमआयएम युतीचा दुसरा अंक; भाजपचे जितेन बरेठिया MIM च्या पाठिंब्यांवर स्वीकृत नगरसेवक
आणखी वाचा
Comments are closed.