मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण! 19 वर्षानंतर 11 दोषींची निर्दोष मुक्तता, मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल

मुंबई बॉम्ब ब्लास्ट प्रकरण: 11 जुलै 2006 च्या मुंबई लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील निकाल मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला आहे. तब्बल 19 वर्षांनंतर या बहुचर्चित हल्ल्यातील 11 दोषींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुराव्याअभावी या सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. यातील 3 कैदी नागपूर तुरुंगात होते. त्यापैकी एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी आणि मोहम्मद अली आलम शेख यांची कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णयानंतर त्यांना दोषमुक्त केलं आहे. तर नावेद हुसेन रशीद हुसेन खान याची जुन्या प्रकरणामुळे सुटका होणे बाकी आहे.

अमरावती मध्यवर्ती कारागृहातून 4 कैद्यांची सुटका

शिक्षा भोगत असताना या कैद्यांनी कारागृहात कायद्याचे शिक्षण घेतले होते. आज दोन कैद्यांचे नातेवाईक त्यांना घ्यायला कारागृहात आले होते.  दरम्यान, 11 पैकी 4 आरोपी हे अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. तनवीर अहमद मोहम्मद इब्राहिम अन्सारी, महद मजीद महद शफी, सुहिल मोहम्मद शेख, जमीर अहमद लतीफुर रहेमान शेख हे कैदी अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. अमरावती मध्यवर्ती करागृहातून देखील या सर्व आरोपींची सुटका करण्यात आली आहे. सर्व चारही आपले सामान घेऊन कारागृहा बाहेर आले आहेत. त्यांचे नातेवाईक त्यांना घ्यायला आले होते. अमरावती मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडून मात्र याबाबत गुप्तता पाळली होती.

मुज्जमिल अत्ताउर रेहमान शेख नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून बाहेर

तसेच मुंबई बॉम्बस्फोटातील निर्दोष मुक्तता झालेला मुज्जमिल अत्ताउर रेहमान शेख नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून  बाहेर आला आहे. निर्दोष मुक्तता झाल्याने त्याला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून सोडले आहे. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात दोन आरोपी शिक्षा भोगत होते, त्यापैकी मोहम्मद साजिद मरगुब अन्सारी हा पॅरोल वर सध्या बाहेर आहे.

नेमकं प्रकरण काय?

11 जुलै 2006 रोजी मुंबईच्या उपनगरीय लोकल रेल्वेत सात वेगवेगळ्या ठिकाणी अवघ्या 11 मिनिटांत झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये 209 जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर 827 हून अधिक प्रवासी जखमी झाले. या स्फोटांनी संपूर्ण देशाला हादरवून टाकले. या प्रकरणात, महाराष्ट्र एटीएसने एकूण 13 आरोपींना अटक केली, तर 15 जणांना फरार घोषित करण्यात आले, ज्यांपैकी बरेच जण पाकिस्तानमध्ये असल्याचा संशय होता. तपास यंत्रणेने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. नोव्हेंबर 2006 मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर, 2015 मध्ये, ट्रायल कोर्टाने 12 आरोपींना दोषी ठरवले. यापैकी 5 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. ज्यांची आता निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Mumbai 2006 Blast Case: 11 मिनिटांत 7 कुकर बॉम्बचा स्फोट, प्रेतांची रास रचली गेली, ‘त्या’ संध्याकाळी मुंबईत काय घडलं होतं?

आणखी वाचा

Comments are closed.