सूडाची भावना की दहशतवादी कट? आरोपीने मुंबईतच 15,000 लोकांसाठी बनवल्या विषारी गोळ्या
मुंबई : मोहरम सणाचा उत्साह मुस्लिम बांधवांमध्ये पाहायला मिळत असून मोहरमच्या दिवशी मुंबईतील (Mumbai) रे रोड भागातील रेहमताबाद कब्रस्तानजवळील अशुरा मिरवणुकीत सहभागी झालेल्या बांधवांना एक कॅप्सूल देण्यात आलं होतं. या कॅप्सूलच्या माध्यमातून अनेक हजारो लोकांना संपवण्याचा प्लान असल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला आज कोर्टात हजर करण्यात आलं. आरोपी फय्याज प्रेमजीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावणी होती, ती कोठडी संपल्यानंतर आज पुन्हा माझगाव कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने (Court) आता 4 जुलैपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, पोलिसांचे पथक तपासासाठी परराज्यात पोहोचले आहे.
मुंबईत शुक्रवारी मोहरमच्या जुलूसमध्ये विषारी कॅप्सूल वाटल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी, फय्याज प्रेमजी असं अटक आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 14 हजार 900 कॅप्सूल ताब्यात घेतल्या आहेत. संबंधित आरोपीने 50 किलो झिंक फॉस्फाइड ऑनलाइन मागवलं होतं. तसेच 30 हजार रिकाम्या कॅप्सूल देखील मागवल्या होत्या. हा आरोपी 15 दिवसांपूर्वी मुंबईत आला होता. नागपाडा परिसरातील सन डॉरमिटीमधे तो राहिला होता, याच ठिकाणी त्याने कॅप्सूलमध्ये झिंक फॉस्फेट भरण्याच काम केलं, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्याने दिलेल्या गोळ्या खाल्ल्याने काहींना विषबाधा होऊन ते रुग्णालयात भरती झाले आहेत.
दहशतवादी कापला असता का?
पोलिसांनी आरोपीकडून 14,900 विषारी गोळ्या जप्त झालेल्या आहेत. आरोपीच्या फोनमधून ज्या लोकांकडून झिंक फॉस्पाइट घेतलं आहे, त्यांचा ठावठिकाणा शोधायचा आहे. आरोपी राज्याबाहेरही जाऊन आला आहे, त्यामुळे सखोल चौकशी आवश्यक आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला. आरोपीने 30 हजार कॅप्सूल बनवल्याचा संशय आहे, आतापर्यंत फक्त 14 हजार जप्त झालेल्या आहेत, त्यामुळे उर्वरीत गोळ्या शोधायचा आहेत, आरोपी फैय्याज हा इराक आणि इराणला जाऊन आलेला आहे, त्यामुळे हा दहशतवादी कट आहे का? अंतराष्ट्रीय कनेक्शन आहेत का? ते शोधायचे आहे. या घटनेने परिसरात दहशत निर्माण झालेली आहे. त्यामुळे, आरोपीला 7 दिवस पोलीस कोठडी हवी आहे, अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली. त्यानंतर, न्यायालयाने आरोपी फय्याज प्रेमजीला 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस तपासासाठी परराज्यात
मुंबईच्या भायखळा येथील विषारी गोळ्या वाटप प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलीस परराज्यात गेले असून आरोपी फैयाज प्रेमजीने झिंक फॉस्पाईट परराज्यातून मागवल्याची माहिती आहे. आरोपीने ह्या गोळ्या कश्या बनवल्या आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याला झिंक फॉस्पियाईत कसे पुरवले गेले, याचा तपास सुरू आहे. काही ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आरोपीने हा माल ऑर्डर केल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. आरोपीने जिथून झिंक फॉस्पाईट मागवले त्या राज्यात पोलीस पोहोचले असून अधिक तपास सुरू आहे.
सूडाच्या भावनेतून कृत्य
सूडाच्या भावनेतून फैय्याज याने मोहरमचे निमित्त साधून समाजातील मुस्लीम बांधवांना धडा शिकवण्यासाठी हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. फैयाज आणि त्याचा भाऊ या दोघांना त्याच्या पत्नींनी सोडून दिले होते. या मागे समाजातील लोकांचा मोठा हात असल्याचा समज त्यांचा होता. यातून समाजाला धडा शिकवण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. तसेच महिनाभरापासून फैयाज या कटाची तयारी करत होता. यासाठी मोबाइलच्या माध्यमातून “झिंक फॉस्फाईड” औषध कंपन्या, कॅप्सूल बनवण्याची पद्धत त्यांचे साहित याबाबतची माहिती इंटरनेटवरून गोळा केली होती. फैयायजच्या मोबाईलमधून याबाबतची माहिती त्याने इंटरनेटवर सर्च केल्याचे आणि लोकांना मारण्यासंदर्भातले चॅटिंगही आढळून आले आहेत.
हेही वाचा
केतन अग्रवाल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च : केतन अग्रवाल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च
Comments are closed.