कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4 वर्षाय चिमुकल्याने जीव गमावला, मुंबईच्या वडाळ्यातील घटनेने ह

मुंबई गुन्हे: कार मागे घेत असताना धडक बसल्याने 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडलीये. मुंबईतल्या (Mumbai Accident) वडाळा (Wadala Accident) येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar College) कॉलेज येथे एका कारने 4 वर्षाच्या मुलाचा अपघात झालाय.  कार मागे घेत असताना दिली चिमुकल्याला धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय. या प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

कार चालक संदीप गोळेला पोलिसांकडून अटक

याबाबत अधिकची माहिती अशी की, मुंबईच्या वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज जवळ एका कार चालकाने गाडी मागे घेत असताना 4 वर्षीय चिमुकल्याला धडक दिली आहे. यातच त्याचा मृत्यू झालाय. दरम्यान, या प्रकरणी चालक संदीप गोळेला पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुष लक्ष्मण किनवाडे असं अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. किनवाडे परिवार वडाळा ब्रिजवर असलेल्या झोपडीत वास्तव्यास आहे.

मुंबईतल्या वडाळा येथे कार चालकाकडून 4 वर्षीय चिमुकल्याला धडक

वडाळ्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज जवळील प्रकार

कार मागे घेत असताना दिली चिमुकल्याला धडक

चिमुकल्याचा जागीच मृत्यू

चालक संदीप गोळेला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे आणि गुन्हा दाखल

आयुष लक्ष्मण किनवाडे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाच नाव

किनवाडे परिवार वडाळा ब्रिजवर असलेल्या झोपडीत वास्तव्यास

इंदापुरात डाळज जवळ रुग्णवाहिकेला अपघात, स्टेअरींग रॉड तुटल्याने रुग्णवाहिका पलटली

इंदापूर (Indapur Accident) तालुक्यातील डाळज नंबर एकच्या पूलाजवळ पुण्यातील ससून रुग्णालयातून नांदेडकडे डेड बॉडी घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेला अपघात झालाय. यात चार वाहनांचे मोठे नुकसान झालेय. रात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात घडला आहे..या रुग्णवाहिकेत चालकासह सात प्रवासी होते सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार हे सर्वजन पुणे येथील ससून हॉस्पिटल या ठिकाणाहून नांदेड या ठिकाणी ॲम्बुलन्स मधून डेड बॉडी घेऊन निघाले होते. रुग्णवाहिकेचा स्टेरिंग रोड तुटला गेला.त्यामुळे ती रस्ता ओलांडून सोलापूर पुणे लेन वर येऊन पलटी झाली. त्यामध्ये चार गाड्यांचे नुकसान झाले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Comments are closed.