पावसाचं पाणी आत येत होतं म्हणून वाद, संतापून बॅगेतून चाकू काढला अन्…; खचाखच भरलेल्या लोकलमध्
मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्ये पावसात दरवाजा बंद (Mumbai Local Train) करण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाची हत्या झाल्याची भयंकर घटना मंगळवारी रात्री घडली. मयंक लोहार (२२) असे हत्या (Mumbai Local Train) झालेल्या तरुणाचे नाव आहे. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास प्रवाशांनी खचाखच भरलेल्या चर्चगेट-नालासोपारा जलद लोकलमध्ये गोरेगाव ते कांदिवली दरम्यान ही संतापजनक घटना घडली. याबाबतचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला. तर आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्याकडून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले असल्याची माहिती समोर आली आहे.(Mumbai Local Train)
लोकलमधील हत्येप्रकरणी आरोपी रोशन सुवर्णाने पोलिसांसमोर धक्कादायक खुलासे केल्याची माहिती आहे.पोलीस सूत्रांकडून आरोपीच्या जबाबातील तपशील समोर आले आहेत. दिवसभर मद्यप्राशन केल्यानंतर आरोपी अंधेरीहून लोकलने घरी निघाला होता. पावसाचे पाणी डब्यात येत असल्याने दरवाजा बंद करण्यावरून वाद झाल्याचा दावा त्याने केला आहे. मृत मयंक लोहार आणि आरोपीमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याची माहिती त्याने दिली. वादादरम्यान मयंकने आरोपीच्या डोळ्यावर ठोसा मारल्याचा दावा आरोपीने केला आहे. काही प्रवाशांनीही मारहाण केल्याचे आरोपीने जबाबात म्हटल्याची माहिती आहे. (Mumbai Local Train)
वादानंतर संतापातून बॅगेतील चाकू काढून मयंकवर वार केल्याचा दावा आरोपीने केला आहे. तर छाती व पोटावर वार झाल्याने मयंकचा मृत्यू झाला आहे. बोरिवली स्थानकाजवळ ट्रेन मंदावताच आरोपीने उडी मारून पलायन केले, हत्येसाठी वापरलेला चाकू सबवेमध्ये फेकून दिल्याचे आरोपीचे म्हणणे आहे. मित्राकडून दोन चाकू घेतल्याची कबुली दिल्याची माहिती आहे. आरोपीच्या जबाबाची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे.
Mumbai Local Train : नेमकं काय घडलं?
पावसात लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले आणि काही कळण्याच्या आत आरोपीने चाकू काढून मयंकच्या पोटावर सपासप वार करत त्याची निघृण हत्या केली. घटनेनंतर पसार झालेल्या हल्लेखोराला पोलिसांनी बुधवारी पनवेलमधून अटक केली. रोशन सुवर्ण असे हल्लेखोराचे नाव आहे. हल्ल्यानंतर मयंक लोकलच्या दरवाजाजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि हल्लेखोर रोशन सुवर्णा चाकू घेऊन उभा होता. हल्ल्यानंतर बोरीवली स्थानक येण्यापूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक ५ जवळ लोकलमधून उडी मारून हल्लेखोर पसार झाला.
Mumbai Local Train : हत्येनंतर घरी आराम, नंतर गाठले पनवेल
मिळालेल्या माहितीनुसार, हत्येनंतर रोशन बोरीवली स्थानकाबाहेर आला आणि रिक्षाने थेट घरी गेला. घरी जेवण करून त्याने आराम केल्याची माहिती समोर येत आहे. सकाळी लवकर घरातून बाहेर पडून पनवेलला पोहोचला. तेथून कर्नाटकला पळून जाण्याच्या तयारीत होता.
Mumbai Local Train :मारेकरी २४ तासांत जाळ्यात
हत्या करून पसार झालेला आरोपी रोशन सुवर्णा (३०) अखेर लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात अडकला. २५ पोलिस अधिकारी आणि ७० हून अधिक कर्मचारी अशा १०० जणांच्या पथकाने ४०० सीसीटीव्हींच्या मदतीने आरोपीचा माग काढत गावी कर्नाटकला पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला पनवेलमधून ताब्यात घेत कारवाई केली.
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
Comments are closed.