महापौर बंगल्याच्या नूतनीकरणावर साडेतीन कोटींचा खर्च करणार, स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी प्रस्ताव

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयाजवळ असणाऱया महापौर बंगल्याची डागडुजी आणि नूतनीकरणाचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. यासाठी 3 कोटी 48 लाख 24 हजार 930 रुपयांचा खर्च केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी बुधवारी होणाऱया स्थायी समितीमध्ये मांडला जाणार आहे.

भायखळा येथील बंगला महापौरांचे निवासस्थान जाहीर करण्यात आला. मात्र 2022नंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आणि महापौर बंगला ओस पडला होता. परंतु 15 डिसेंबर 2025 रोजी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा या बंगल्याची डागडुजी व दुरुस्तीची कामे हाती घेत पूर्ण केली. त्यानंतर रितू तावडे यांनी महापौर पदाची जबाबदारी 11 फेब्रुवारी रोजी स्वीकारली. त्यानंतर त्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती व उद्यान प्राणीसंग्रहालयातील महापौर बंगल्यावर प्रवेश करणे अपेक्षित होते. मात्र नवीन घरात प्रवेश करण्याआधी घरातील अंतर्गत सजावट व किरकोळ दुरुस्तीच्या सूचना महापौर रितू तावडे यांनी दिल्या आहेत. त्यामुळे मे अखेरपर्यंत महापौर रितू तावडे यांचा भायखळ्यातील महापौर बंगल्यात प्रवेश होईल, असे सांगण्यात आले.

अशी होणार कामे…

 बंगल्याच्या अंतर्गत फर्निचरची पूर्णतः दुरुस्ती करणे.
 सर्व शौचालयांचे नवीन टाईल्स, फिक्स्चर्स, डब्ल्यूसी.
 पहिल्या मजल्यावरील बेडरूमसाठी अतिरिक्त स्वच्छतागृह.
 तळमजल्यावर अतिरिक्त बेडरूमची व्यवस्था करणे.
 पुरातन पद्धतीची झुंबरे व प्रकाशयोजना करणे.
 तळमजल्यावरील सभागृहाचे बैठकीच्या खोलीमध्ये रूपांतर.
 अत्याधुनिक सोयीसुविधांसह स्वयंपाकगृहाचे पूर्ण नूतनीकरण.
 तळमजल्यावर इटालियन मार्बल्सनी फरशीचे नूतनीकरण.
 पुरातन पद्धतीचे व्हेनेशियन लावणे.

Comments are closed.