एकनाथ शिंदेंचा भाचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत; मुंबईतील ‘या’ प्रभागातून उमेदवारीही फायनल
मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. या निवडणुकीच्या दृष्टीने अनेक पक्ष प्रवेश होताना दिसत आहेत. दरम्यान, मुंबईत महायुतीत दोस्टी कुस्ती होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत मोठा धक्का बसला आहे. त्यांचे सख्खे भाचे आशिष माने यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या उपस्थितीत आशिष माने यांनी प्रवेश केला आहे.
मुंबईत महायुतीत दोस्तीत कुस्तीला सुरुवात
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून चांदिवली मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 159 मधून आशिष माने यांना उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना मुंबईत मोठा धक्का बसला आहे. त्यांचे सख्खे भाचे आशिष माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळं मुंबईत महायुतीत दोस्तीत कुस्तीला सुरुवात झाली आहे. एका बाजुला एकानाथ शिंदे यांच्या भाच्याला तर दुसरीकडे भाजपच्या माजी महामंत्री नेहा राठोड यांना देखील राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी देण्याचे ठरवले आहे. दोघांचाही पक्ष प्रवेश करुन तिकीट दिल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांचे भाचे आशिष माने यांना 174 मधून तर भाजपच्या माजी महामंत्री नेहा राठोडला 156 मधून उमेदवारी देण्यात आली आहे.
राज्यात महापालिका निवडणुकांसाठी (Maharashtra Municipal Corporation Election 2026) राजकीय वातावरण तापलं आहे. 29 महापालिकेसाठी 23 डिसेंबर पासून अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. 30 डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. त्यामुळं अर्ज भरण्यास बाकी दोन दिवसच उरले आहेत. अर्जांची छाननी 31 डिसेंबरला होईल. 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. निवडणूक चिन्हांचं वाटप, अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारीला प्रसिद्ध होईल. सर्व 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होईल तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
निवडणुकांना अवघे 18 दिवस बाकी आहेत, मात्र अजूनही महायुत्या (Mahayuti), महाआघाड्यांची (Mahavikas Aghadi) अधिकृत घोषणा झालेली नाही. ठाकरे बंधुंच्या युतीची घोषणा झाली आहे. जागावाटपचाचं त्रांगडं अजूनही कायम आहे. मुंबई महानगरसह राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकत्रत लढतील असं चित्र आहे. पुण्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक सहा मनपा असून याठिकाणी भाजप आणि शिंदे सेनेत युतीवरून अजूनही खणाखणी सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या:
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज’कारण’
आणखी वाचा
Comments are closed.