Mumbai News – दिवाळी आणि छठ पूजे दरम्यान फुकट्या प्रवाशांकडून 24.74 कोटींचा दंड वसूल
दिवाळी आणि छठ पूजा दरम्यान विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने विशेष मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत फुकट्या प्रवाशांकडून सुमारे 24.74 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 1 ते 15 नोव्हेंबर 2026 या कालावधीत मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये अनेक विशेष तपासणी मोहिमा राबवण्यात आल्या. या काळात विनातिकीट प्रवास करणाऱ्या 2.27 लाख प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
मुंबई विभागात 1.06 लाख प्रकरणांतून 11.04 कोटी रुपये, भुसावळ विभागात 64,332 प्रकरणांत 7.98 कोटी रुपये, पुणे विभागात 23,189 प्रकरणांत 2.67 कोटी रुपये, नागपूर विभागात 24,253 प्रकरणांत 2.25 कोटी रुपये आणि सोलापूर विभागात 9,134 प्रकरणांत 79.38 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.
Comments are closed.