मुंबई पोलिसांकडून ‘मुन्नाभाई MBBS’ चा गेम, तरुणाला लेखी परीक्षेत हायटेक कॉपी करणं भोवलं

मुंबई : मुंबई पोलिसांच्या लेखी परीक्षेत   ‘मुन्ना भाई MBBS’  स्टाईलने कॉपी करू पाहणाऱ्या प्रशिक्षणार्थीला पोलिसांनी अटक केली आहे. ओशिवराच्या रायगड मिलिटरी स्कूल, हॉल क्रमांक 312 न्यू लिंक रोड, ओशिवरा जोगेश्वरी पश्चिम या परीक्षा सेंटरवर हा प्रकार घडला. यात कृष्णा दळवी या 22 वर्षीय प्रशिक्षणार्थीला पोलिसांनी अटक केली आहे

मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षेत अभिनेता संजय दत्त याच्या मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटात दाखवण्यात आलेल्या परीक्षेसारखा प्रकार करण्याचा केला. मायक्रो फोन डिवाइस द्वारे कॉपी करण्याचा कृष्णा दळवी हा प्रयत्न करत होता.

कृष्णा दळवी हा पेपर लिहीत असताना इअर मायक्रो फोन डिवाइसच्या मदतीने पेपरात कॉपी करत होता. कृष्णाच्या संशयित हालचालीवर परीक्षेदरम्यान सुपरवायझरचे काम  करत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना संशय आला.

इअर मायक्रो फोन डिवाईस या उपकरणाद्वारे त्याचे साथीदार सचिन बावस्कर, प्रदीप राजपूत हे त्याला पेपरातील उत्तर सोडवण्यास मदत करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

कृष्णा दळवी हा मूळचा जालनाच्या भोकरदन येथील मानपूर गावचा रहिवाशी आहे.या प्रकरणी कुष्णा आणि त्याचे दोन साथीदार सचिन बावस्कर, प्रदीप राजपूत या तिघांविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी कुष्णाकडून एक मोबाइल सिमकार्ड, मोबाइल आणि कॉपी करण्यासाठी वापरण्यात आलेले इअर मायक्रो फोन डिवाइस जप्त केले आहे.

पोलिसाला संशय आला अन्…

मुंबई पोलिसांकडून वाहनचालक कॉन्स्टेबल पदासाठी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेदरम्यान कृष्णा दळवी याच्या संशयास्पद हालचाली पोलीस कर्मचाऱ्याच्याला दिसून आल्या. कृष्णाच्या कानात असलेल्या डिवाइस कुणाला दिसून येणार नाही अशा पद्धतीन बसवण्यात आला होता. मात्र, त्याचा डाव फसला आणि अटकेत जावं लागलं आहे.

दरम्यान, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र यांच्याकडून या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सखोल तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतरचा परीक्षेतील पहिला गैरप्रकार समोर आला आहे.  राज्य सरकारनं या प्रकरणाचा योग्य तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे. तर युवकंनी सर्वच परीक्षांमध्ये गैरमार्गाचा वापर करणं टाळलं पाहिजे.

इतर बातम्या :

Parli Accident : अपघात की घातपात? परळीत राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने सरपंचाला उडवलं, घटनास्थळाचे व्हिडिओ आले समोर

अधिक पाहा..

Comments are closed.