मुंबईतील आंदोलनात सिव्हील ड्रेसमधील पोलिसाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा विरोधकांचा आरोप;
मुंबई: गेल्या काही दिवसांत दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाची आणि मोर्चाची धग राज्यभरात पाहायला मिळाली, दिल्लीसह महाराष्ट्रात देखील ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी, तरूण-तरूणींनी विविध पक्षांनी आंदोलने (Mumbai Protest Video Viral) केली, मोर्चे काढल्याचे पाहायला मिळाले. या आंदोलनावेळी घडलेल्या अनेक घटनांचे व्हिडीओ फोटो सोशल मिडीयावरती (Mumbai Protest Video Viral)व्हायरल झाले आहेत. यामध्ये पोलिस तरूणांना धमक्या देताना त्याचबरोबर मुली, तरूणी, महिला यांच्यासोबत अश्लील वर्तन करताना, नको तसं खेचून मारहाण करताना आणि बँड टच करत असतानाचे व्हिडीओ दिल्लीसह मुंबईतूनही समोर आले, अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यासह काही नेत्यांनी सोशल मिडीयावरती एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, या व्हिडीओमध्ये एक पोलिस तरूणीला विचित्र प्रकारे पकडून खेचताना दिसत आहे, या व्हिडीओसोबतच रोहित पवारांनी संतापजनक पोस्ट देखील लिहली आहे. (Mumbai Protest Video Viral)
हा व्हिडिओ बघून डोक्याची तिडीक उठली. कोण आहे नराधम?
याच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत हा किती किळसवाण कृत्य करतोय. हा पोलीस असेल तर पहिले याला निलंबित नाही तर पोलीस दलातून बडतर्फ करा.. आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा.
एक वेगळी प्रतिष्ठा असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाला… pic.twitter.com/LsvEhwALzT– रोहित पवार (@RRPSpeaks) 23 जुलै 2026
Mumbai Protest Video Viral: पोलिस अशा पद्धतीने कारवाई करू शकतात का?
मुंबईतील आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पकडतानाचा पोलिस कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल मुंबई काॅंग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्याकडून हा व्हिडिओ एक्स वर पोस्ट करत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर केले प्रश्न उपस्थित पोलिस अशा पद्धतीने कारवाई करू शकतात का? अशा पोलीसांचे तात्काळ निलंबन करावे अशी मागणी एक्स पोस्टच्या मदतीने केली आहे दादरमधील आंदोलनादरम्यान एका तरुण महिला आंदोलकाची एका पुरुष पोलिसाकडून विनयभंग व धक्काबुक्की झाल्याचा व्हिडिओ काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत त्यांनी मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या व्हिडीओवर विरोधी पक्षातील लोकांनी हि हा व्हिडीओ ट्विट करत पोलिसाला बडतर्फ करत विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा अशी मागणी केलीय, जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट करत हा पोलीसी अतिरेक सरकारच्या अंगाशी येईल आवरा ह्यांना अशी पोस्ट केली आहे
महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अत्यंत तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका मुलीसोबत किळसवाणे कृत्य करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ पाहून “डोक्याची तिडीक उठली” अशी संतप्त प्रतिक्रिया देत, संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ पोलीस दलातून बडतर्फ करून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी त्यांनी केली आहे.
मुंबई पोलिसांचे हे काय वर्तन आहे? एक पुरुष पोलीस तरुण महिला आंदोलकाला असे का मारतो? तो आपल्या महिला सहकाऱ्यांना हे का हाताळू देत नाही? त्याच्यावर काय कारवाई होणार? हे अस्वीकार्य आहे @Dev_Fadnavis pic.twitter.com/H48j8l4JhI
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) 23 जुलै 2026
Mumbai Protest Video Viral: काय म्हणाले रोहित पवार?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या घटनेचा निषेध करताना आमदार रोहित पवार यांनी लिहिले की, “हा व्हिडिओ बघून डोक्याची तिडीक उठली. कोण आहे नराधम? याच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत हा किती किळसवाण कृत्य करतोय. हा पोलीस असेल तर पहिले याला निलंबित नाही तर पोलीस दलातून बडतर्फ करा.. आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा. एक वेगळी प्रतिष्ठा असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाला लागलेली ही कीड आहे.,” अशी आक्रमक मागणी त्यांनी केली.
Mumbai Protest Video Viral: पोलीस दलाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र पोलीस दलाला मोठी ऐतिहासिक आणि सन्मानजनक परंपरा लाभलेली आहे. मात्र, अशा प्रकारच्या घटनांमुळे संपूर्ण दलाची मान खाली जात असल्याचे रोहित पवार यांनी नमूद केले. “एक वेगळी प्रतिष्ठा असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाला लागलेली ही कीड आहे,” अशा कडक शब्दांत त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, आमदारांच्या या आक्रमक भूमिकेनंतर आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाकडून संबंधित कर्मचाऱ्यावर काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Comments are closed.