अफगाणिस्तानच्या व्यापाऱ्याला दहशतवादी म्हणून मारहाण, नागपूरमधील घटना
नागपूर : मूळच्या अफगाणिस्तानच्या एका व्यापाऱ्यावर दहशतवादी असल्याच्या आरोप करत प्राणघातक हल्ला केल्याची घटना नागपुरात घडली आहे. यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत यादव नगर भागात ही घटना घडली आहे. फहीम खान मामातुर मर्जक ( वय 46 वर्ष) असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
फहीम खान ममातूर मर्ज गेले अनेक वर्षे नागपूरच्या मोठा ताजबाग परिसरात सरताज कॉलनीत राहतात. ते शहरात फिरून ब्लँकेट विकतात. फहीम मूळचे अफगाणिस्तानातील निवासी आहेत. मात्र सध्या नागपुरात राहतात.
तरुणाने धमकी दिली
रविवारी, 27 जुलै रोजी रात्री एका परिचित व्यक्तीसोबत ते एका कारमधून एका ग्राहकाकडे फ्रीज बघायला गेले होते. रात्री पावणेबारा वाजता ते कारने परत जायला निघताना पार्किंगजवळ एका तरुणाने त्यांना गाठले. त्या तरुणाने फहीम यांना ‘तू दहशतवादी आहेस आणि इथे यायचे नाही,’ असे म्हटले.
अन्य दोन आरोपींच्या मदतीने मारहाण
फहीम यांनी त्यावर ते कपडा व्यापारी असल्याचे सांगितले. मात्र, तरुणाने त्यांना धमकावले. त्यानंतर काही न बोलताच फहीम यांना मारायला सुरुवात केली. फहीम यांच्या साथीदारांनी त्या तरुणाला थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र अन्य दोन आरोपी दुचाकीने तेथे पोहोचले. त्यांनी देखील फहीम यांना मारहाण सुरू केली.
पहिल्या आरोपीने सिमेंटच्या पेव्हर ब्लॉकने फहीम यांच्या डोक्यावर प्रहार केले. यात फहीम गंभीर जखमी झाले. त्यानंतर फहीम यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून हल्ला करणाऱ्या अजय चव्हाण (30), ऋषी (20) आणि मयंक (19) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षिकेचे विद्यार्थ्यासोबतच अश्लील चाळे
नवी मुंबईतील एका शिक्षिकेने तिच्याच शाळेतील एका अल्पवयीन विदयार्थ्यासोबत अश्लील व्हिडिओ कॉल केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी प्राथमिक तपासणीनंतर पोलिसांकडून कोपरखैरणे येथील ठाण्यात शिक्षिकेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर शिक्षिका ही इंस्टाग्रामवर अर्धनग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल करत होती. याबाबतची माहिती विदयार्थ्याने त्याच्या पालकांना सांगितल्यावर पालकांनी कोपरखैरणे पोलीस ठाणे गाठून शिक्षिकेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर, आरोपी शिक्षिकेला अटक केली असताना न्यायालयाने शिक्षिकेला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, संबंधित शिक्षिकेने शाळेतील इतर विद्यार्थ्यांसोबत, आणखी कोणासोबत अशा प्रकारचे कृत्य केले आहे का? या दिशेने कोपरखैरणे पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, या घटनेनं शाळेत आणि शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.