नागपूर हिंसाचार प्रकरणी विश्व हिंदू परिषदेचा मोठा आरोप; कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी देण
नागपूर: नागपूर हिंसाचार प्रकरणी विश्व हिंदू परिषदेने मोठा आरोप केला आहे. आमच्या नागपुरातील अनेक कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे फोन आज ही येत असून त्यांना वैयक्तिकरित्या टार्गेट केले जात आहे, नागपुरात दंगल घडवणारेच या धमक्यांमागे असून त्यापैकी अनेक जण आजही मोकळे आहेत. नागपुरात हिंसा करणाऱ्यांना मदत करणारे, पाठिंबा देणारे लोकं अजूनही सक्रिय असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह बातचीत करताना केला आहे. त्यामुळे नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी अटक होण्याची गरज असून आम्ही यासंदर्भात पोलिसांना कळविल्याची माहिती ही मिलिंद परांडे यांनी दिली आहे.
एवढेच नाही तर केंद्र सरकारने घेतलेल्या जातनिहाय गणनेच्या निर्णयासंदर्भातही विहीपने खूप इंटरेस्टिंग भूमिका जाहीर केली आहे.. अनेक दशकांपासून विश्व हिंदू परिषद एखाद्या जातीसाठी नाही, तर समस्त हिंदू धर्मासाठी काम करणारे संघटन आहे. सरकारने जरी जातनिहाय गणनेचा आदेश दिला असला, तरी विहिप हिंदू समाजाच्या ऐक्यासाठी काम करत राहील असेही परांडे म्हणाले. या गणनेत फक्त हिंदू धर्मातील जातींची नाही, तर मुस्लिम धर्मातील विविध जातींची ही गणना होईल आणि त्यामुळे मुस्लिम म्हणजेच मागास मुस्लिम संदर्भातील सत्यही समोर येईल असं विहिपचं म्हणणं आहे. दरम्यान, नाशिकमध्ये होणाऱ्या महाकुंभसाठी नाशकात उपलब्ध असलेली जागा इतर ठिकाणी होणाऱ्या कुंभसाठी उपलब्ध जागेच्या तुलनेत खूप कमी आहे. त्यामुळे नाशिकच्या कुंभमध्ये काही अडचणी निर्माण होऊ शकतात अशी शक्यता ही परांडे यांनी व्यक्त केली.
काय आहे विहीपचे म्हणणे?
* पूर्वी जातनिहाय गणनेची मागणी फक्त हिंदू धर्मासंदर्भात होती. मात्र, आता संपूर्ण लोकसंख्येच्या जातनिहाय गणनेचा निर्णय झाला आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये अंतर आहे.
* जातनिहाय गणनेचा आदेश आला, तरी आम्ही हिंदू समाजाच्या ऐक्य कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत राहू.
* जातनिहाय गणनेच्या माध्यमातून मुस्लिम धर्मातील विविध जातींची ही गणना होईल आणि त्यामुळे पसमांदा मुस्लिम म्हणजेच मागास मुस्लिमांसंदर्भातले सत्यही देशासमोर येईल आणि सरकारच्या निर्णयाचा तोच अर्थ निघतो..
* नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये कुंभ साठी उपलब्ध असलेली जागा कुंभ साठी उपलब्ध असलेल्या इतर कुठल्याही शहरातील जागेपेक्षा कमी. त्यामुळे काही अडचणी निर्माण होऊ शकतात.
* आम्ही संतांशी तसेच सरकारच्या ही संपर्कातअसून संवादातून अडचणींवर मार्ग करण्याचा प्रयत्न करू. मात्र, कमी जागेमुळे सर्व अडचणींवर मार्ग काढता येईल असे वाटत नाही.
* नागपूर हिंसाचार पूर्वनियोजित होते हे स्पष्ट आहे.
* आमच्या अनेक कार्यकर्त्यांना आजही जीवे मारण्याची धमकी देणारे फोन येत असून त्यांना टार्गेट केले जात आहे.
* त्यामुळे नागपुरात दंगल घडवणारे आजही मोकळे फिरत असल्याने नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी अटक होण्याची गरज आहे. आम्ही या संदर्भात पोलिसांना कळवले आहे आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे.
* बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने नागपुरात जे आंदोलन केलं, ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेमापोटी केलं. या देशात छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज हेच आदर्श ठरू शकतात. औरंगजेब या देशात कधीही आदर्श होऊ शकत नाही.
* औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात असावी की नाही, यासंदर्भात मात्र कुठल्याही स्पष्ट उत्तर दिलं नाही.
अधिक पाहा..
Comments are closed.