डॉक्टर होण्याचं स्वप्न…पण मुंबईच्या रस्त्यावर भीक मागण्याची वेळ; दीड महिन्यांपासून बेपत्ता वि

नांदेड : डॉक्टर होण्याचं स्वप्न… पण मुंबईच्या रस्त्यावर भीक मागण्याची वेळ एका तरूणावर आल्याची (Nanded News) घटना समोर आली आहे.  होमिओपॅथीच्या तिसऱ्या वर्षात शिकणारा विद्यार्थी अभय (Nanded News) दीड-दोन महिने बेपत्ता होता. या बेपत्ता अभयला मालाड पोलिसांनी (Malad Police) शोधलं. मंदिर, प्लॅटफॉर्म, बसस्टॉपवर त्याने दिवस काढले. गावी जायचंय… म्हणत अभय तीन दिवस भीक मागत होता. मालाड एस. व्ही. रोडवर बीट मार्शलना (Nanded News) संशयास्पद अवस्थेत तो आढळला. पोलिसांनी (police) त्याच्याशी संवाद साधला त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. मुलगा समोर येताच आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले. शिक्षक वडिलांचा आणि डॉक्टर भावाचा भावनिक क्षण होता. मालाड पोलिसांच्या संवेदनशीलतेचं सर्वत्र कौतुक होत आहे. (Nanded News)

Nanded News:  नेमकं काय घडलं?

होमिओपॅथीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेला आणि डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणारा नांदेडचा अभय गेल्या दीड-दोन महिन्यांपासून मुंबईत (Mumbai News)  बेपत्ता झाला होता, तो रस्त्यांवर भीक (Mumbai News)  मागून जगत असल्याचं दिसून आलं होतं. ‘मला माझ्या गावी जायचे आहे आणि म्हणून मी तीन दिवस भीक मागत असल्याचे’ त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे लक्षात आल्यावर अत्यंत संवेदनशीलपणे पोलिसांनी (Mumbai Police) त्याला खायला घालून त्याच्याशी संवाद साधला व घरचा पत्ता मिळवला. पोलिसांनी कुटुंबाशी संपर्क साधला आणि त्याची कुटुंबाशी पुन्हा भेट झाली. लेकाला पाहून बापाचा ऊर भरून आला आणि त्यांनी लेकाला घट्ट मिठी मारली. (Mumbai News)

Nanded News:  दीड-दोन महिन्यांत त्याने काय केले?

तर मिळालेल्या माहितीनुसार, अभयचे वडील सुरेश हे शिक्षक आहेत तर, त्याचा मोठा भाऊ औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. अभय छोटी बॅग घेऊन घराबाहेर पडला होता, मात्र परतला नाही. मालाड पोलिसांमुळे अभय पुन्हा आपल्या कुटुंबाच्या सुरक्षित छायेखाली परतल्याने अधिकाऱ्यांचे आभार मानले

तर अभयला पोलिसांनी विचारलं की, तू दीड-दोन महिन्यांत काय केले? असे विचारले असता, ‘मी ट्रेनने इंदूरला गेलो आणि तिथून पुन्हा मुंबईत परतलो. यादरम्यान माझी बॅग हरवली. त्यात कागदपत्रे तसेच कुटुंबीयांचे संपर्क क्रमांक असल्याने मानसिक स्थिती खालावली. पोट भरण्यासाठी गावी परत जाण्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्म, बसस्टॉप आणि रस्त्यावर भीक मागू लागलो,’ असे अभयने पोलिसांना सांगितले.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.