मुदखेड पोलिसांची मोठी कारवाई; अवैध गोवंश तस्करी करणाऱ्यावर कारवाई, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुदखेड पोलिसांनी ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत मोठी कारवाई करत अवैध गोवंश ताब्यात बाळगणाऱ्या आरोपींवर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत संशयित गोवंशाचे मांस आणि जिवंत जनावरे असा एकूण १ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुदखेड पोलिसांनी गुजरी चौक परिसरातील कुरेशी मोहल्ल्यात छापा टाकला. या वेळी विविध ठिकाणी कत्तलीसाठी ठेवलेले गोवंश आणि विक्रीसाठी साठवलेले मांस आढळून आले.

या कारवाईत पोलिसांनी अंदाजे २२० किलो संशयित गोवंशाचे मांस तसेच ९ जिवंत जनावरे जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या जनावरांमध्ये विविध रंग व वयाच्या गायी आणि कालवडींचा समावेश आहे.

या प्रकरणी मोहम्मद नसीर मोहम्मद नजीर, जुनेद कुरेशी अली, अकबर कुरेशी, इम्रान खुरेशी, मेहमुद खुरेशी आणि मोहम्मद गौस मोहम्मद पाशा कुरेशी (सर्व रा. मुदखेड जि. नांदेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धिरज चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब कांबळे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शिंदे आणि त्यांच्या टीमने केली आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अवैध गोवंश तस्करी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments are closed.