पोलिसांच्या हाताला हिसका देत आरोपीनं ठोकली धूम; बारा तासांच्या सिनेस्टाईल पाठलागानंतर गजाआड

नाशिक गुन्हेगारी बातम्या: नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये प्राण घातक हल्ल्याच्या गुन्ह्यात संशयित असलेला आरोपी क्रिश शिंदे याला भद्रकाली पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान कोर्टात हजर केल्यानंतर क्रिश शिंदे याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र त्यानंतर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीला (Crime News) आणताना पोलिसांच्या हाताला हिसका देऊन त्यानं चक्क धूम ठोकल्याची घटना घडली आहे. क्रिश शिंदे हा पळून गेल्याची घटना काल (29 एप्रिल) रात्री घडली असून संशयित आरोपी पळून जातानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. आरोपीला मदत करणारा दुचाकी चालक देखील सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळत आहे. या संदर्भात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलीस ठाण्याच्या आवारातून आरोपी पळाल्यानंतर भद्रकाली पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली आहे.

दरम्यान, भद्रकाली पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. मात्र क्रिश शिंदेचा कुठेही पत्ता लागला नाही. त्यामुळे त्याला तात्काळ अटक करण्यासाठीचे पोलिसांसमोरचे आव्हान उभे झाले होते. मात्र भद्रकाली पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेल्या आरोपीचा सतत तपास केला असता, अखेर बारा तासांच्या सिनेस्टाईल पद्धतीच्या पाठलागानंतर त्याला कसारा घाटातील जंगलातून ताब्यात घेतले आहे. भद्रकाली गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली आहे.

उधार चहा, सिगारेट दिली नाही हॉटेल चालकाचा बेदम मारहाणीत खून

उधार चहा व सिगरेट न दिल्याच्या रागातून दोन जणांनी हॉटेल चालकाला बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये हॉटेल चालकाचा मृत्यू झाला असून या प्रकरणात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. परभणीच्या गंगाखेड शहरातील गोदाकाठावरील या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पुढे आलेल्या माहितीनुसार, गंगाखेडमधील गोदाघाटावर मारोती साळवे यांचे बाबा सैलानी नावाचे चहाचे हॉटेल आहे. या हॉटेलवर आज आवेज खान गफ्फार खान, जुनेद खान जरावर खान हे दोघे जण आले. त्यांनी किशोर भालेराव यांच्या सांगण्यावरून चहा सिगरेट मागितली. मात्र हे दोघे नेहमी वस्तू घेवून पैसे देत नसल्याने साळवे यांनी त्यांना चहा सिगरेट दिली नाही. मग रागात येवून या दोघांनी थांब तुला दाखवतो तुला खूप माज आलाय असे म्हणत तिथून निघाले यावेळी मारोती साळवे व अरविंद साळवे यांनी या दोघांच्या पाठलाग केला व त्यांना तुम्ही आम्हाला वारंवार का त्रास देत आहात अशी विचारणा केली  असता दोघांकडून ही मारोती साळवे यांना बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

तिन्ही गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या

या प्रकरणात अरविंद साळवे यांच्या फिर्यादीवरून अवेज खान गफार खान पठाण. रा. नेहरू चौक गंगाखेड.जुनेद जरवार खान रा. वजीर कॉलनी गंगाखेड.किशोर मंचक भालेराव रा. नवा मोंढा गंगाखेड. यांच्या विरोधात भारतीय न्याय सहिंता 2023 नुसार 103(1),115(2),352, 351(1), 3(5), अनुसचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंद )1989नुसार. 3(2)(VA), 3(1)(r),3(1)(s) नुसार पोलीस ठाणे गंगाखेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा होण्या आधीच गंगाखेड पोलीस आणि स्थानिक गुन्हे सायबरच्या पाथकाने गुन्हातील तिन्ही गुन्हेगारांना ताब्यात घेत अटक केली आहे.

हे ही वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.