मोठी बातमी! पश्चिम बंगालच्या मुर्शीदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपीला नाशिकमधून अटक

नाशिक गुन्हेगारी बातम्या: पश्चिम बंगालमध्ये मागिल वर्षी झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपीला नाशिकमधून अटक करण्यात आली आहे. NIAच्या पथकाने नाशिक पोलिसाच्या मदतीने हि कारवाई केली आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शीदाबादमध्ये 2024 मध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यातील मुख्य आरोपी 7 ते 9 महिन्यापासून नाशिकमध्ये वेषांतर करून राहत असल्याची माहिती NIA ला मिळाली होती, त्यानुसार पश्चिम बंगालचे पथक मागील महिन्यात नाशिकमध्ये दाखल झाले होते. नाशिकच्या सातपूर MIDC परिसरात सतत दोन दिवस तपास करून नाशिक क्राईम ब्रँचच्या मदतीनें हि कारवाई करण्यात आली आहे?

बनावट आधारकार्ड बनवून एका कंपनीत नोकरी

पुढे आलेल्या माहितीनुसारसंशयित आरोपीने बनावट आधारकार्ड बनवून एका कंपनीत नोकरी देखील मिळवली होती. या कारवाई बाबत पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. बॉम्बस्फोटातील आरोपी नाशिकमध्ये वास्तव्यास कसा आला. त्याला स्थानिकांची मदत मिळाली होती का? या दृष्टीने तपास सुरू आहे. NIA कडून नाशिक पोलिसांचे प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आल्याने पोलिसाची करवाई समोर आली आहे.

अयोध्येतील श्री राम मंदिर उडवून देण्यासाठी बीडच्या तरुणाला मेसेज

अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवून देण्याचा मेसेज बीडच्या एका तरुणाला थेट पाकिस्तानातून आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात शिरूर कासार पोलीस ठाण्यात तरुणाने तक्रार देखील दिली. कटात सहभागी होण्यासाठी एक लाखाची ऑफर या तरुणाला दिल्याचं त्याने तक्रारीत म्हटल. शिवाय संशयिताने कराचीतील लोकेशन देखील पाठविले.

शिरूर तालुक्यातील एक तरुण सोशल मीडियाचा वापरकर्ता आहे. सोशल मीडिया वापरत असताना त्याला एक मेसेज आला. या मेसेजमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी दिली. आपण पाकिस्तानी आहोत हे पटवून देण्यासाठी संशयीने कराचीतील लोकेशनही तरुणाला पाठवले. शिवाय कटात सहभागी होण्यासाठी एक लाख रुपयांची ऑफर दिली. या कामासाठी 50 जण हवे असून त्यांना प्रत्येकी एक लाख देऊ तर मंदिर उडवण्यासाठी आरडीएक्स पुरवू असे संशयितने मेसेज द्वारे सांगितले.

दरम्यान, या खळबळजनक घटनेनंतर तरुणाने शिरूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीनुसार संशयीतावर गुन्हा दाखल असून हा नेमका काय प्रकार हे तपासानंतर स्पष्ट होईल असं पोलिसांनी सांगितलं.

आणखी वाचा

आणखी वाचा

Comments are closed.