मुलींच्या शरीराला नको तिथे स्पर्श, प्रेमाचं नाटक करून फोटो, व्हिडीओ काढले, नंतर कुटुंबियांची भी
नाशिक क्राईम न्यूज : नाशिकमधील (Nashik) मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मल्टिनॅशनल आयटी कंपनीत (IT Company) महिलांच्या शोषणाचे अत्यंत भयानक रॅकेट उघडकीस आले आहे. नोकरी करणाऱ्या हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे आणि त्यानंतर धर्मांतरासाठी दबाव टाकणे, असा खळबळजनक प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू होता. याप्रकरणी आतापर्यंत 9 गुन्हे दाखल झाले असून नाशिक पोलिसांनी (Nashik Police) सहा संशयितांना अटक केली आहे. आता या प्रकरणात एक खळबळजनक माहिती समोर येत आहे.
या कंपनीत हिंदू मुलींसोबत शरीराला स्पर्श करत त्यांना प्रेमात अकवण्याचा प्रयत्न होत होता. प्रेमाचं नाटक करून वेगवेगळी आमिष दाखवली जात होती. तसेच मुलींसोबत अश्लील कृत्य देखील केले जात होते. अश्लील कृत्य करताना फोटो आणि व्हिडिओ काढून कुटुंबाला सांगण्याची भीती घालून धर्मांतराचा प्रयत्न केला जात होता. मीटिंग आणि कामाच्या वेळी पायाने स्पर्श आणि नंतर लॉबीमध्ये शरीराशी झटापट करून महिलांचा विनयभंग केला जात होता.
Nashik Crime News: महिलांच्या श्रद्धेवरही घाव घातला
हे नराधम केवळ शरीरावर नाही तर महिलांच्या श्रद्धेवरही घाव घालत असल्याची माहिती समोर आली आहे. हिंदू देव-देवतांचा अपमान करून पौराणिक ग्रंथांचा विकृत अर्थ लावून अश्लील शेरीबाजी करत होते. कंपनीत नोकरी करणाऱ्या अनेक मुली आणि महिलांना हे त्यांच्या एकट्यासोबत घडत असल्याचे वाटत होते. मात्र, कालांतराने हे सर्व आणि फक्त हिंदू मुलींसोबतच घडत असल्याचे उघड झाले आहे.
Nashik Crime News: ‘त्या’ कंपनीला टाळं लागणार
दरम्यान, लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील नामांकित कंपनीला टाळं लागणार आहे. कंपनीमधील कर्मचाऱ्यांना आता मुंबई, पुण्यातील इतर प्रोजेक्टमध्ये शिफ्ट केलं जाणार असल्याची माहिती आहे. नाशिकमधील धर्मांतर प्रकरण उघडकीस आल्यानंतर कर्मचाऱ्यांना नाशिक युनिटमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना एकतर मुंबई-पुण्याला स्थलांतरित व्हावं लागणार आहे किंवा नवीन नोकरी शोधावी लागणार आहे.
नाशिकमधील एका कंपनीमधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर देशभर खळबळ उडाल्याचं चित्र आहे. त्यामुळे या कंपनीने आता नाशिकमधील त्यांचं युनिटच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या कंपनीमध्ये पोलीस तपासाच्या कारणास्तव मोजकेच कर्मचारी येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेचा तपास करण्यासाठी नाशिक पोलिसांनी एसआयटी स्थापन केली आहे. कागदपत्रांची तपासणी तसेच इतर माध्यमातून पोलीस चौकशी सुरू आहे. कंपनीच्या आवारात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.