मुलांच्या वेशात तरुणी ट्रकचालकांना थांबवायच्या, नंतर शस्त्राचा धाक दाखवून…; नाशिकमधील टोळीचा
नाशिक गुन्हा: नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik – Pune Highway) सिन्नर फाटा (Sinnar Phata) परिसरात ट्रक चालकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीचा नाशिक पोलिसांनी (Nashik Police) पर्दाफाश केला आहे. या गुन्ह्यात दोन तरुणींना अटक करण्यात आली असून तीन आरोपी अद्याप फरार आहेत. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्या दोन्ही तरुणी मुलांचा पेहराव करून ट्रकचालकांना थांबवून लूट करत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
काय आहे प्रकरण?
ही घटना सिन्नर फाटा परिसरातील असून, पहाटेच्या सुमारास सिन्नरकडे जाणाऱ्या एका ट्रकला पाच जणांच्या टोळीने अडवले. ट्रकचालक रामेश्वर वर्मा याला धारदार शस्त्राचा धाक दाखवत, त्यांनी त्याच्याकडील 5 हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने घेतली, तसेच त्याच्याकडून 1 हजार रुपये ‘फोन पे’ द्वारे ट्रान्स्फर करून घेतले. लूट झाल्यानंतर ट्रक चालकाने तात्काळ 112 हेल्पलाइनवर कॉल करून पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांची तात्काळ कारवाई
माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. या दरम्यान एक संशयास्पद रिक्षा त्या परिसरातून जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तिचा पाठलाग करून थांबवले. रिक्षेतून दोन तरुणी सापडल्या. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
तीन साथीदारांचा शोध सुरु
या तरुणी मुलासारखा पेहराव करत होत्या आणि ट्रक चालकाला फसवून लुटण्यात सहभागी होत्या. त्यांच्याबरोबर असलेले तीन अन्य साथीदार मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पलायन करण्यात यशस्वी झाले. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत या टोळीने याआधीही नाशिक परिसरात अशाच पद्धतीने ट्रक चालकांना लक्ष्य करून लुटल्याचा संशय पोलीस व्यक्त करत आहेत. या संदर्भात अधिक तपास सुरू आहे.
Nashik Accident News : चांदवडच्या राहुड घाटात गॅस टँकरला अपघात
दरम्यान, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चांदवच्या राहूड घाटामध्ये भारत गॅसच्या बुलेट टँकरला ट्रकने कट मारल्याने गॅस टँकर पलटी होऊन झालेल्या अपघातामुळे टँकरमधून गॅसची गळती सुरू झाली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरून मालेगावकडे जाणारी सर्व वाहतूक मनमाडमार्गे वळवण्यात आली आहे. तर मालेगावकडून येणारी वाहतूक चिंचवे उमराणे दरम्यान बंद करण्यात आलेली असून दोन्ही बाजूची वाहतूक मनमाडमार्गे वळविण्यात आलेली आहे. या टँकरमधून सध्या गॅस गळती सुरू आहे. गॅस गळती थांबवण्यासाठी मनमाड, सिन्नर येथून पथक रवाना झाले आहे. तर घटनास्थळावर अग्निशमन दलाचे बंब सज्ज ठेवण्यात आले आहे. सोमाटोल कंपनीचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झालेले आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.