नाशिकमध्ये भाजपकडे 50 जागांची मागणी, अन्यथा स्वबळावर लढणार, शिवसेना नेते हेमंत गोडसेंचा इशारा
हेमंत गोडसे: राज्यात महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. येत्या 15 जानेवारीला यासाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज मुंबईसह राज्यातील अनेक महापालिकांमध्ये ठाकरे बंधुंनी युतीची घोषणा केली आहे. त्याचबरोबर भाजप आणि शिवसेना यांच्या देखील याबाबत बोलणी सुरु आहेत. अशातच नाशिक महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात अद्याप कुठलीही युतीची चर्चा नसल्याचे गोडसे म्हणाले. आम्ही भाजपकडे 50 जागांची मागणी करणार अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचा इशारा गोडसे यांनी दिला आहे.
नाशिक महानगरपालिके संदर्भात सेना-भाजप युतीबाबत चर्चा नाही
अद्याप पर्यंत आमच्याकडे प्रवेश सुरू आहेत त्यामुळे युतीची चर्चा नसल्याची माहिती हेमंत गोडसे यांनी दिली आहे. नाशिक महानगरपालिके संदर्भात सेना-भाजप युतीच्या घोषणेच्या चर्चेवर मजी .खासदार हेमंत गोडसे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. स्थानिक पातळीवर चर्चा करून युती संदर्भात निर्णय घेणार असल्याचे गोडसे म्हणाले.
आमच्याकडे धनुष्यबाणावर निवडून आलेले 35 नगरसेवक
स्थानिक पदाधिकारी नामदार दादा भुसे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. स्थानिक पातळीवरती जे काही पदाधिकाऱ्यांची मागणी आहे ती वरिष्ठांपर्यंत पोहोचवली आहे .अद्याप कुठलाही युतीचा निर्णय किंवा संख्येचा निर्णय झालेला नाही. आमची 50 जागांसाठीची मागणी असणार आहे. आमच्याकडे धनुष्यबाणावर निवडून आलेले 35 आणि त्यानंतर सुरू असलेला प्रवेश आणि उर्वरित जागा असे आम्ही 50 जागांची मागणी करणार असल्याचे हेमंत गोडसे म्हणाले. प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे या दृष्टीने प्रत्येक पक्ष काम करत आहे. आमच्याकडे अजून प्रवेश सुरू आहेत आज दोन काँग्रेसच्या नगरसेवकांनी प्रवेश केल्याची माहिती हेमंत गोडसे यांनी दिली आहे. सकारात्मक चर्चा करण्याच्या दृष्टीने आम्ही बैठक घेऊ, अन्यथा आम्ही स्वबळावर लढणार असल्याचा इशारा गोडसे यांनी दिला आहे.
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय नेत्यांनी हालचाली सुरु केल्या आहेत. काही पक्षांच्या युतीबाबत चर्चा सुरु आहेत. तर काही पक्षांच्या आघाडी करण्यासंदर्भातील चर्चा सुरु आहेत.
महत्वाच्या बातम्या:
मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी वाघ नाही; रावसाहेब दानवेंचा ठाकरे बंधूंवर पलटवार, बोचरी टीका
आणखी वाचा
Comments are closed.