महायुतीतील काही नेत्यांनीच घात केला, म्हणून माझा पराभव; नरेंद्र दराडेंचा थेट आरोप, एकनाथ शिंदें

नाशिक विधान परिषद निवडणूक निकाल 2026: नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचा (Nashik Vidhan Parishad Election Result 2026) अत्यंत धक्कादायक आणि राज्याची राजकीय समीकरणे बदलून टाकणारा निकाल नुकताच समोर आला आहे. महायुतीची (Mahayuti) जिल्ह्यात मोठी ताकद आणि सर्वाधिक लोकप्रतिनिधी असतानाही, अपक्ष उमेदवार गोकुळ गीते (Gokul Gite) यांनी या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या अनपेक्षित निकालानंतर महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर आता नरेंद्र दराडे यांनी आपल्या पराभवाची सविस्तर कारणमीमांसा केली असून, महायुतीतील काही अंतर्गत नेत्यांनीच आपला घात केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Nashik Vidhan Parishad Election Result 2026: महायुती धर्म न पाळल्यानेच पराभव

आपला पराभव नेमका कसा झाला, यावर खंत व्यक्त करताना नरेंद्र दराडे म्हणाले की, नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या काही नेत्यांनी घात केला, म्हणून माझा पराभव झाला. या पराभवाला कोण जबाबदार आहे, याबाबत मी माझा तोंडी अहवाल शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना सादर केला आहे. एकनाथ शिंदे यांनी माझ्या पाठीशी ठाम असल्याबाबत विश्वास देखील दिला आहे. भविष्यात शिवसेनेचेच काम जोमाने करणार आहे. पक्ष वाढीसाठी विजयी उमेदवार गोकुळ गीते यांना सहयोगी सदस्य म्हणून पक्षाने सोबत घेतले असून त्या निर्णयाबाबत एकनाथ शिंदे यांच्याकडून मला विचारणा देखील झाल्याची माहिती नरेंद्र दराडे यांनी दिली. महायुती काही नेत्यांनी युती धर्म पाळायला हवा होता तो न पाळल्याने माझा पराभव झाला असल्याची खंत पराभूत उमेदवार नरेंद्र दराडे यांनी व्यक्त केली आहे.

Nashik Vidhan Parishad Election Result 2026: शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून गोकुळ गीते काम करणार

दरम्यान, मंत्री उदय सामंत आणि मंत्री गिरीश महाजन यांनी गोकुळ गीते यांची मनधरणी करण्याचे अनेक प्रयत्न केले होते. या प्रयत्नांनंतर गोकुळ गीते यांनी तांत्रिकदृष्ट्या माघार घेण्याची घोषणा केली होती, मात्र त्यांना छुपा पाठिंबा मिळाल्यामुळे निकाल त्यांच्याच बाजूने लागला. विजयानंतर गोकुळ गीते विशेष विमानाने मुंबईत दाखल झाले आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याची अधिकृत घोषणा केली.

Nashik Vidhan Parishad Election Result 2026: नाशिक विधान परिषद निवडणूक अंतिम निकाल

नाशिक एकूण मतदान – 618

अवैध मतदान – 13

वैध मतदान – ६०५

अंतिम कोटा – 303

अपक्ष गोकुळ गीते – 357

शिवसेना नरेंद्र दराडे – 248

निकाल – गोकुळ गीते विजयी

आणखी वाचा

Gokul Gite: भविष्यात पक्ष संघटनेची जबाबदारी दिली तर…; गोकुळ गीतेंचा शिंदे-सामंतांसमोरच मोठा शब्द, नेमकं काय-काय म्हणाले?

Comments are closed.