एकनाथ शिंदेंच्या शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुखाला अटक, भंगारवाल्याकडून दोन लाखांची खंड
नवी मुंबई गुन्हे: नवी मुंबईतील राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भंगार (Scrap) व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाकडून तब्बल 2 लाख रुपयांची खंडणी (Extortion) मागितल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख पूजा बनसोडेला (Pooja Bansode) तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे पूजा बनसोडे आणि तिच्या सहकाऱ्यांनी व्यावसायिकाला तसेच त्याच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराला बेदम मारहाण व शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप आहे.
Navi Mumbai Crime: दुकान चालवण्यासाठी मागितली खंडणी
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचे नवी मुंबईतील इंदिरा नगर (Indira Nagar) परिसरात भंगाराचे दुकान आहे. या परिसरात जर दुकान चालवायचे असेल, तर 2 लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी शिंदे गटाच्या उपजिल्हा संघटक पूजा बनसोडेने दिली होती. तक्रारदाराने ही खंडणी देण्यास नकार दिला.
Navi Mumbai Crime: दुकानात घुसून कामगारांना बेदम मारहाण केल्याचा आरोप
खंडणीचे पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या पूजा बनसोडेने तिचे सहकारी रमजान शेख, सरिता सरवदे, नरेंद्र साकवार आणि हुसेन शेख यांना सोबत घेऊन थेट तक्रारदाराच्या दुकानात धाड घातली. यावेळी या सर्वांनी मिळून व्यावसायिक आणि त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
Navi Mumbai Crime: मुख्य आरोपी अटकेत, साथीदार फरार
या प्रकारानंतर पीडित व्यावसायिकाने थेट पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा (Case) दाखल केला आणि मुख्य आरोपी पूजा बनसोडेला बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्यातील पूजाचे इतर चार साथीदार सध्या फरार असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. एका सत्ताधारी पक्षाच्या महिला नेत्यालाच खंडणी प्रकरणात अटक झाल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
Comments are closed.