NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावक

NEET Exam 2026 Paper Leak Case : देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाची (NEET Exam 2026 Paper Leak) धग संपूर्ण राज्यासह देशभरात दिसून आली. NEET पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून राज्यभरात मोठी कारवाई करण्यात आली. नीट पेपर फुटी प्रकरणात एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात CBIची मोठी कारवाई

देशासह राज्यभरात गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात CBIने आणखी १३ आरोपींना अटक केली आहे. लातूरमधील डॉक्टर मनोज शिरुरे यांनाही या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. रसायनशास्त्र विषयाचे लीक झालेले प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तर पुण्यातील APMA कोचिंग संस्थेतील भौतिकशास्त्र शिक्षक तेजस हर्षदकुमार शाह यांनाही अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर भौतिकशास्त्राचे लीक प्रश्न मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. देशभरातील 49 ठिकाणी CBI ने छापे टाकले असून तपासात अनेक कागदपत्रे, लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे. यात दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणेलातूर आणि अहिल्यानगर येथून आतापर्यंत 13 आरोपी अटकेत आहे. रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच लीक झाल्याचा तपासात दावा करण्यात आला आहे.

NEET Paper Leak Case News : नीट पेपर फुटी प्रकरणातील 13 आरोपी

1. पी. व्ही. कुलकर्णी: तपास यंत्रणांनुसार, माजी रसायनशास्त्र तज्ञ पी. व्ही. कुलकर्णी यांनी शिवराज मोटेगावकरच्या सांगण्यावरून नीटचा पेपर फोडला. कुलकर्णी यांनी अनेक वर्षे राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या (NTA) प्रश्नपत्रिका-निर्धारण समितीवर काम केले होते. त्यांनी या सुरक्षा व्यवस्थेचा आणि गोपनीयतेचा गैरवापर करून प्रश्नपत्रिका फोडली.

2. शिवराज मोटेगावकर: महाराष्ट्रातील लातूर येथील प्रसिद्ध आरसीसी कोचिंग संस्थेचे संचालक हे पेपरनीट पेपर फुटी प्रकरणातील 13 आरोपी

1. पी. व्ही. कुलकर्णी: तपास यंत्रणांनुसार, माजी रसायनशास्त्र तज्ञ पी. व्ही. कुलकर्णी हे या संपूर्ण रॅकेटचे सूत्रधार आहेत. कुलकर्णी यांनी अनेक वर्षे राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या (NTA) प्रश्नपत्रिका-निर्धारण समितीवर काम केले होते. त्यांनी या सुरक्षा व्यवस्थेचा आणि गोपनीयतेचा गैरवापर करून प्रश्नपत्रिका फोडली.

2. शिवराज मोटेगावकर: महाराष्ट्रातील लातूर येथील प्रसिद्ध आरसीसी कोचिंग संस्थेचे संचालक. तपासानुसार, नीट पेपर फुटीचा मुख्य सुत्रधार शिवराज मोटेगावकर आहे. त्याने त्याच्या क्लास मधील मुलांना अधिक मार्क्स मिळावेत यासाठी पेपर फुटीचा कट रचला. अधि परीक्षेच्या सुमारे १० दिवस आधी त्यांच्या मोबाईल फोनवर रसायनशास्त्राचे १३२ हस्तलिखित प्रश्न आणि त्यांची उत्तरे मिळाली होती, त्यापैकी १११ प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळत होते. त्यांनी, इतर सह-आरोपींसोबत मिळून, हे प्रश्न विद्यार्थ्यांना आणि इतर केंद्रांमध्ये पसरवले.

3. धनंजय लोखंडे- पेपरफुटी प्रकरणात धनंजय लोखंडे हा एक मुख्य संशयितांपैकी एक आहे.. नाशिक येथील संशयित शुभम खैरनार याच्या चौकशीत धनंजय लोखंडेचे नाव समोर आले होते. शुभमने त्याला ई-मेलद्वारे प्रश्नपत्रिका पाठवल्याचा व या प्रकरणाशी संबंधित आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सीबीआय आणि स्थानिक पोलिसांनी मे २०२६ मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातून धनंजय लोखंडेला ताब्यात घेतले

4. मनीषा गुरुनाथ मांढरे: पुण्यातील एक वरिष्ठ वनस्पतीशास्त्र शिक्षिका, ज्यांना एनटीएने नीट परीक्षा प्रक्रियेसाठी तज्ञ म्हणून नियुक्त केले होते. त्यांना वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्राच्या प्रश्नपत्रिका थेट उपलब्ध होत्या, ज्याचा गैरवापर करून त्यांनी प्रश्नपत्रिका फोडल्या.

5. मनीषा संजय हवालदार: भौतिकशास्त्राची प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात तिची प्रमुख भूमिका उघडकीस आली आहे. तिनेच प्रश्नपत्रिका पुन्हा लिहिल्या हे सिद्ध करण्यासाठी सीबीआय तिच्या हस्ताक्षराच्या नमुन्यांची फॉरेन्सिक तपासणी करत आहे.

6. तेजस हर्षदकुमार शाह: पुण्यातील डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकादमी (APMA) येथील शिक्षक. त्याला सहआरोपी मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राच्या फुटलेल्या प्रश्नपत्रिका मिळाल्या होत्या.

7. डॉ. मनोज शिरुरे: लातूर येथील एक डॉक्टर, ज्याने रसायनशास्त्राच्या फुटलेल्या प्रश्नपत्रिका पसरवण्यात आणि मध्यस्थांचे जाळे उभारण्यात भूमिका बजावली.

8. मनीषा वाघमारे: पुण्यातील रहिवासी, ती मनीषा मंदारेच्या संपर्कात होती आणि विशेष शिकवणी देण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांना फुटलेल्या प्रश्नपत्रिका पुरवण्यासाठी पैसे गोळा करत असे व निधी गोळा करत असे.

9. शुभम खैरनार-  नीट पेपरफुटी प्रकरणात नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील शुभम खैरनार या ३० वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.. त्याने १० लाखांत प्रश्नपत्रिका विकत घेऊन ती १५ लाखांत पुढे विकल्याचा आरोप आहे.

10. यश यादव- हरियाणातील गुरुग्राम (फरुखनगर) येथील रहिवासी असलेला यश यादव, नीट यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक आहे. तपास यंत्रणांच्या मते, यश यादवच्या माध्यमातूनच फुटलेली प्रश्नपत्रिका राजस्थान आणि इतर राज्यांमध्ये पोहोचली.

11. दिनेश बिनवाल, 12. मांगिलाल बिनवाल, 13. दिनेश बिनवाल- तपासाच्या आधारे, सीबीआयने १३ मे रोजी दिनेश बिनवाल, त्याचा भाऊ मंगिलाल बिनवाल आणि दिनेशचा मुलगा विकास बिनलाव यांना जयपूरच्या जामवारामगड येथून अटक केली आहे. दिनेश बिवाल, मांगीलाल बिवाल आणि विकास बिवाल यांनी गुरुग्राममधील एका नेटवर्ककडून (यश यादव) लाखो रुपये देऊन NEET चा पेपर आधीच मिळवला होता. दिनेश बिवालने या पेपरची ‘हाताने लिहून’ पीडीएफ (PDF) बनवली आणि ती सीकरमधील कोचिंग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली. तपासानुसार, नीट परीक्षेच्या सुमारे १० दिवस आधी त्यांच्या मोबाईल फोनवर रसायनशास्त्राचे १३२ हस्तलिखित प्रश्न आणि त्यांची उत्तरे मिळाली होती, त्यापैकी १११ प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळत होते. त्यांनी, इतर सह-आरोपींसोबत मिळून, हे प्रश्न विद्यार्थ्यांना आणि इतर केंद्रांमध्ये पसरवले.

शैक्षणिक कर्ज माहिती:
शैक्षणिक कर्ज EMI ची गणना करा

हेदेखील वाचा

Comments are closed.