नीलेश घायवळ टोळीतील फरार गुंड अखेर गजाआड! पुण्याहून बार्शीत लपून बसला, पोलिसांना कुणकुण लागली अ
पुणे: कोथरूड गोळीबार प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये म्हणजेच मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या टोळीतील फरार आरोपीला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव अमोल दत्तात्रय लाखे, वय २७ वर्षे, रा. ईटखेडा, छत्रपती संभाजीनगर असं आहे. लाखे हा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे लपून बसला होता. वारजे माळवाडी (Nilesh Ghaywal Gang) पोलिसांच्या पथकाने सापळा रचत त्याला बार्शीतून ताब्यात घेतलं.(Nilesh Ghaywal Gang)
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि टोळीप्रमुख नीलेश घायवळ अद्याप फरार आहे. तो सध्या ब्रिटनमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी पुणे पोलिसांनी ब्रिटिश उच्चायुक्तांशी संपर्क साधत पत्रव्यवहार सुरू केला आहे. कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी टोळीविरोधात मकोका अंतर्गत कडक कारवाई सुरू केली असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं कार्यरत आहेत.(Nilesh Ghaywal Gang)
कोथरूड गोळीबार प्रकरणात फरार असलेला गुंड नीलेश घायवळ हा सध्या परदेशात असून, अद्याप त्याला ताब्यात घेण्यात आले नाही. घायवळ हा सध्या ब्रिटनमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी पुणे पोलिसंनी ब्रिटीश उच्चायुक्तांशी संपर्क पत्रव्यवहार करण्यात आले आहे. खंडणी प्रकरणात घायवळ टोळीविरुद्ध वारजे पोलिसांनी ‘मकोका’ कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात अमोल लाखे याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर तो पसार झाला होता. लाखे हा बार्शी परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांना मिळाली. त्यानंतर त्याला सापळा लावून ताब्यात घेण्यात आले.
Nilesh Ghaywal: नेमकं प्रकरण काय?
१७ सप्टेंबर रोजी रात्री पावणेबाराला पुण्यातील कोथरूड परिसरामधील मुठेश्वर चौकात घडली होती, तक्रारदार मित्रांसमवेत गप्पा मारत असताना, घायवळ टोळीतील गुंड दुचाकीवरून जात होते. त्यांना जाण्यासाठी रस्ता न दिल्याच्या किरकोळ कारणांवरून भांडणे झाली. त्यातून आरोपींनी धुमाळ यांना मारहाण केली. त्यापैकी एकाने त्यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. त्यानंतर काही वेळाने आरोपींनी सागर कॉलनी परिसरात वैभव साठे याच्यावर कोयत्याने वार केले. आम्ही या भागाचे भाई आहोत, असे म्हणून आरोपींनी दहशत माजवली, असे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी घायवळ टोळीच्या सदस्यांसह टोळीच्या म्होरक्यावरती देखील मकोका अंतर्गत कारवाई केली. यादरम्यानच्या तपासात टोळीप्रमुख निलेश घायवळ फरार असून, तो परदेशात पळून गेला असल्याचं समोर आलं. त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस काढली आहे. त्याच्या अटकेसाठी पासपोर्ट रद्द करण्याचा न्यायालयाने आदेश द्यावा, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.
आणखी वाचा
Comments are closed.