नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
सिंधुदुर्ग : राज्यात नगरपालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून महायुती आणि महाविकास आघाडीत स्थानिक पातळीवर कुरघोडी सुरू असल्याचं दिसून येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री नितेश नितेश राणे यांनी स्वबळाची भाषा केली असून शिवसेना (Shivsena) शिंदे गटानेही नगरपालिका निवडणुकांमध्ये एकटं लढण्याची तयारी दर्शवली आहे. त्यावरुनआता भाजप नेते नितेश राणे आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यात वादाची ठिगणी पडली आहे. नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर दिवा केसरकर (Deepak kesarkar) यांनीही शिवसेनेची तयारी असल्याचं म्हटलं होतं. मात्र, आज पुन्हा एकदा नितेश राणेंवर दाबा करत केसरकरांनी फेरविचार करण्याची सूचना राणेंना केली आहे.
पालकमंत्री नितेश राणेंना दिवा केसरकरांनी घराचा आहेर दिला असून नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे असतं, अशा शब्दात केसरकरांनी सुनावलं आहे. महायुती म्हणून निवडणूक लढवली असती तर कणकवलीमधील आजची परिस्थिती निर्माण झाली नसती. माझा सुरवातीपासून आग्रह होता, महायुती म्हणून आपण लढवलं पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची युतीला संमती होती. मात्र, कुठे माशी शिंकली माहिती नाही, असेही दीपक केसरकर यांनी म्हटले. नितेश राणे यांनी पालकमंत्री म्हणून स्वतः युतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे असता. गेले वर्षभर आमदार म्हणून नितेश राणेंच्या मागे शिवसेना ठामपणे उभा आहे. युतीबाबत अजूनही त्यांनी विचार करावा. आम्ही नेहमी लवचिक आहोत, महाराष्ट्रात जशी महायुती भक्कम आहे, तशी ती कोकणात राहावी, हे बाळासाहेबांचं स्वप्न होत. अजूनही वेळ गेली नसल्याचंही दिवा केसरकर यांनी म्हटलं. त्यामुळे, आता नितेश राणे काय भूमिका घेतात ते पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र, नितेश राणेंनी यापूर्वीच जाहीरपणे भाषणात आपली भूमिका स्पष्ट केली होती.
कुंभमेळ्यात हिंदूंनीच दुकाने लावावी – राणे
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दरम्यान हिंदूंनीच या कुंभमेळ्यामध्ये दुकानं लावावी, असे विधान मंत्री नितेश राणे यांनी काल नाशिक दौऱ्यावर असताना केले. त्यामुळे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदू कार्ड खेळण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा देखील सुरू झाली आणि या विधानानंतर एक नवा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, नितेश राणे यांच्या विधानानंतर नाशिकमधील साधू-महंतांकडून देखील या विधानाचे स्वागत करत याप्रकरणी सरकारनेच लक्ष घालावे आणि ज्याला हिंदू धर्म मान्य नाही, देव देवतांची पूजा मान्य नाही, अशा लोकांवर कुंभमेळ्याच्या काळात व्यवसायावर निर्बंध आणावे, अशी भूमिका घेतल्याचं दिसून आलं.
हेही वाचा
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
आणखी वाचा
Comments are closed.