ओमराजेंच्या मनधरणीसाठी उद्धव ठाकरेंकडून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न; आदित्य ठाकरेंचीही मध्यरात
Omraje Nimbalkar and Uddhav Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणातील संभाव्य बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena UBT) गटाकडून आपल्या खासदारांना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांचे मन वळवण्यासाठी आणि त्यांची पक्षातच थांबण्याची खात्री करण्यासाठी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यंत्रणा हलवली आहे. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा (Pawanraje Nimbalkar Case) कोर्टाचा निकाल आल्यानंतर तातडीने चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपले दोन विश्वासू शिलेदार आमदार कैलास पाटील (Kailas Patil) आणि वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांना ओमराजेंकडे पाठवले होते.
Omraje Nimbalkar: वरुण सरदेसाई आणि कैलास पाटलांची विस्तृत चर्चा
मिळालेल्या माहितीनुसार, वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पुण्याच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या नेत्यांमध्ये अत्यंत विस्तृतपणे चर्चा झाली. कोर्टाच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांचे नेमके काय म्हणणे आहे आणि त्यांची मनस्थिती कशी आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न या दोन्ही नेत्यांनी केला.
ओमराजे निंबाळकर आणि आदित्य ठाकरे : ते आदित्य ठाकरे यांच्याशी फोनवर बोलत आहेत.
केवळ आमदारांची भेटच नाही, तर मध्यरात्री खासदार ओमराजे निंबाळकर यांचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यासोबतही फोनवर बोलणे झाल्याची माहिती समोर आली आहे. आदित्य ठाकरे यांनीही या संपूर्ण राजकीय घडामोडींसंदर्भात ओमराजेंशी सविस्तर चर्चा केल्याचे समजते.
Omraje Nimbalkar: ओमराजेंचा ‘मातोश्री’ला निरोप
20 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यामुळे निंबाळकर कुटुंबीय सध्या पूर्णपणे निराश झाले आहे. या पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना ‘मातोश्री’ला एक महत्त्वाचा निरोप पाठवला आहे. आपल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून त्यांचं म्हणणं जाणून घेऊन आपला पुढचा राजकीय निर्णय घेणार, असा निरोप ओमराजेंनी ठाकरेंना दिला आहे.
Omraje Nimbalkar and Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचे शेवटपर्यंत प्रयत्न सुरू
ओमराजे निंबाळकर यांचे नेमके काय म्हणणे आहे आणि त्यांची पुढची भूमिका काय असू शकते, या संदर्भातील संपूर्ण माहिती रात्री भेटलेल्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. आपल्या खासदाराला सोबत ठेवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरेंकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे आता ओमराजे निंबाळकर कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर काय निर्णय घेतात? यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे
Comments are closed.