ऑपरेशन लोटस; जयकुमार गोरेंचा अकलूजकरांना दे धक्का, माने पाटील, माने देशमुख कुटुंबीय भाजपच्या वा
अकलूज: महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे वडील शंकरराव मोहिते पाटील हे ज्या मानदेशमुख परिवारातून मोहिते पाटील परिवारामध्ये दत्तक गेले होते, त्याच माने देशमुख व माने पाटील परिवार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित झाले आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सुरू केलेल्या ऑपरेशन लोटसचा फटका आता अकलूज येथील मोहिते पाटील यांना बसणार आहे. काल सोलापूर जिल्ह्यातील तीन माजी आमदार आणि भाजपमध्ये प्रवेश करताना अकलूज येथील माने पाटील व माने देशमुख परिवाराने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजप प्रवेशा संदर्भात चर्चा केली आहे. यावेळी माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते उपस्थित होते.
Solapur News: लवकरच हे दोन परिवार अकलुजमध्ये भाजपात प्रवेश करणार
सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष लोकनेते कैलासवासी सूर्यकांत दादा माने देशमुख यांच्या तीनही मुलांनी व अकलूजच्या माने पाटील परिवारातील दिगग्ज नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत. अकलूज येथील माने पाटील व माने देशमुख कुटुंबाने काल (बुधवारी, ता 29) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत घेतली भेट घेत एक तास चर्चा केली. लवकरच हे दोन परिवार अकलुजमध्ये भाजपात प्रवेश करणार आहेत. यामध्ये जेष्ठ नेते हिंदुराव दादा माने पाटील,शशिकांत अण्णा माने पाटील, विक्रमभाऊ माने देशमुख,अमृतभैया माने देशमुख,सुजयसिंह माने पाटील, जयराजभैया माने पाटील,अमरभाऊ माने देशमुख, आनंद माने माने देशमुख,गिरीराज माने पाटील,इंद्रनील माने देशमुख यांचा समावेश असणार असल्याची माहिती आहे. अकलूज परिसरात माने देशमुख आणि माने पाटील यांची फार मोठी ताकद असून अकलूज नगर परिषद आणि माळशिरस जिल्हा परिषद पंचायत समितीला त्यांचा मोठा फायदा होऊ शकणार आहे.
Solapur News: आमदार राजन पाटील, यशवंत मानेंचा भाजपात पक्षप्रवेश
सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने व विक्रांत पाटील, अजिंक्यराणा पाटील आणि माढा येथील माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजीतसिंह शिंदे यांच्यासह त्यांचे बंधू यांनी आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रवेश करण्यात आला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे व अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी उपस्थित होते. या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चा पारंपरिक बालेकिल्ला असलेला जिल्हा हादरला असून, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची चिन्हे आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.