अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अन्यथा तुमच्या सभा उधळून लावू, भीम आर्मीचा इशारा
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राजीनामा द्यावा अन्यथा महाराष्ट्रामध्ये तुमच्या सभा उधळून लावू, एकही पत्रकार परिषद होऊ देणार नाही, असा इशारा भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे (Ashok Kamble) यांनी दिला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लडके चिरंजीव पार्थ पवार यांनी पुणे कोरेगाव याठिकाणी 40 एकर महार वतन जमीनl महाभ्रष्टाचार केला आहे. अजित पवार आपण उपमुख्यमंत्री आहात, सर्वाना सामान न्यायाच्या भूमिकेतून आपण कार्य केले पाहिजे. परंतु आपण तसे करताना दिसत नसल्याचे अशोक कांबळे म्हणाले.
पार्थ पवार यांच्यासहित संबंधित अधिकारी यांच्यावर अट्रॉसिटी गुन्हा नोंद झाला नाही तर…
लवकरात लवकर पार्थ पवार यांच्यासहित संबंधित अधिकारी यांच्यावर अट्रॉसिटी गुन्हा नोंद झाला नाही तर अजित पवार यांना महाराष्ट्रात कुठेही आपल्या राजकीय सभा होऊ देणार नाही, पत्रकार परिषद होऊ देणार नाही असे अशोक कांबळे म्हणाले. तुमच्या सर्व सभा भीम आर्मी उधळून लावेल. आमचा अन्यायाविरुद्ध हा लढा संघर्ष आहे. आमच्या अधिकारासाठी हा संघर्ष आहे. आम्ही संविधानिक मार्गाने संघर्ष करू आणि जिंकूही असेही अशोक कांबळे म्हणाले.
नेमकं प्रकरण काय? (Pune Parth Pawar Land)
1800 कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ 300 कोटींमध्ये घेतली तसंच यासाठी स्टँप ड्युटी म्हणून केवळ 500 रूपये मोजल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादस दानवे यांनी केला. महत्वाचं म्हणजे पार्थ पवारांनी कोरेगाव पार्कात आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली, एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय. या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने 48 तासात स्टॅम्प ड्युटीही माफ केली, तर केवळ 27 दिवसांत हा व्यवहार झाला असं अंबादास दानवे म्हणाले.
या प्रकरणात प्रथमदर्शनी जे दोषी आढळले, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या संपूर्ण व्यवहारात ज्यांचा सहभाग दिसला, त्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जर कोणी चुकीचे काम करत असेल, तर हे सरकार त्यांच्या पाठीशी उभे राहणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे. मुद्रांक शुल्क भरण्याबाबत जी नोटीस देण्यात आली आहे, ती संबंधितांना देण्यात आली आहे. मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय कोणताही व्यवहार रद्द होत नाही हा नियम आहे. तो नियम येथेही काटेकोरपणे पाळला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण! दाखल झालेली क्रिमिनल केस संपणार नाही, दोषींवर कारवाई होणार : मुख्यमंत्री
आणखी वाचा
Comments are closed.