Photo – शिवसेनेच्या जनआक्रोश मोर्चाला नाशिककरांची तुफान गर्दी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

खड्ड्यांनी हैराण झालेल्या नाशिककरांसाठी शिवसेना आज रस्त्यावर उतरली होती. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात शिवसेनेने नाशिक महापालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चात हजारोंच्या संख्येने नाशिककर सहभागी झाले होते.

भगवे झेंडे, जय भवानी जय शिवाजी, अशा घोषणांनी मोर्चाला सुरुवात झाली. नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला, केंद्रात सत्ता.. राज्यात सत्ता.. मनपात सत्ता.. अजून किती खाणार भत्ता.. असे फलक हातात घेऊन शिवसैनिक मोर्चात सहभागी झाले होते.

हा विशाल मोर्चा नाशिक महानगरपालिकेवर धडकला. सारा परिसर शिवसैनिकांनी दणाणून सोडला. या मोर्चाचे शेवटी सभेत रुपांतर झाले. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका करत हल्लाबोल केला

ही रस्त्यावरची शिवसेना आहे. सत्तेत शिवसेना नसली तरी रस्त्यावर शिवसेनेची सत्ता आहे, असे म्हणत खड्डे कधी बुजवणार याची कालमर्यादा द्या अन्यथा तुम्ही आहोत आणि आम्ही आहोत असा खणखणीत इशारा संजय राऊत यांनी दिला.

Comments are closed.