पिंपरीत भाजप विरोधात सर्वपक्षीय एकवटणार, मनसे-काँग्रेस एकत्र, अजित पवारांनाही निमंत्रण धाडलं
पुणे : मुंबईत काँग्रेस आणि मनसेचे सुत जुळत नसले तरी पिंपरी चिंचवडमध्ये मात्र काँग्रेस आणि मनसेने सोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडीची बैठक घेण्यात आली, यात मनसेचे नेतेही सहभागी झाले होते. शिवाय महादेव जानकरांच्या रासपचेही नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी आमच्या आघाडीत आली तरी आमची हरकत नाही, असं म्हणत या सर्व पक्षीयांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही मविआत येण्याचं आमंत्रण धाडलं आहे. एकंदरीत पिंपरीत भाजपच्या विरोधात सर्वपक्षीयांनी मोट बांधण्याची तयारी सुरू केल्याचं चित्र आहे.
Pimpri-Chinchwad Election : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी हालचाली
महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडमध्ये स्वबळाचा नारा दिला. याला काही तास उलटले न उलटले, पिंपरी चिंचवड शहरात पवार काका-पुतणे एकत्र येण्याच्या दृष्टीने पुढचं पाऊल पडल्याचं चित्र आहे.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या निवडणूक कोअर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे या दोघांची बैठक पार पडली. दोन्ही राष्ट्रवादीची एकत्रितरित्या अशी पहिल्यांदाच चर्चा झाली. यावेळी सुप्रिया ताईंचा मला काही दिवसांपूर्वी फोन आला होता, तेव्हा त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये मतविभाजन न करण्याचा अन् शरद पवार गटाच्या स्थानिकांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला असा दावा नाना काटे यांनी केला. काटे आणि गव्हाणे यांनी अजितदादा आणि सुप्रियाताईंसह वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करतच ही बैठक घेतल्याचं स्पष्ट केलं.
या चर्चेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तुतारीच्या चिन्हावर उमेदवार उभे करायचे की फक्त घड्याळ चिन्हावर लढायचं? केवळ दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी करायची की एकनाथ शिंदे शिवसेनेला सोबत घ्यायचं? भाजप विरोधी लढण्यासाठी यातील कोणतं समीकरण अंतिम करायचं? यावर दोन्ही राष्ट्रवादीने ही पहिल्यांदाच एकत्रितरित्या चर्चा केली.
Pimpri-Chinchwad NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीत इनकमिंग
मैत्रीपूर्व लढत करावी अस सांगितल्यावर पिंपरी चिंचवडच्या भाजपच्या नगरसेवक आणि ठाकरे गटाच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी थेट अजित पवारांकडे आपला मोर्चा वळवला आहे. भाजपने कामं केली नाहीतर, त्यांनी दबाव टाकून मागील काही वर्षइ कामं करू दिली नाहीत असा थेट आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला.
भाजपच्या माजी नगरसेवक अश्विनी जाधव यांनी दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आहे. तर भाजपने कामच केलं नाही, कोणता विकास केला नाही असा आरोप करत ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. महिला शहर प्रमुख रूपाली अल्हाट, योगेश बोऱ्हाटे, संदीप अल्हाट, संगमेश वलांडे आणि इतरांनी प्रवेश केला. सोबतच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर फायदा होईल असं नवीन प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांचं मत आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.