पोलिसांची दिलगिरी व्यक्त, माझ्या व्यक्तिगत अनुभवावरून…; एकनाथ शिंदेंनी कान टोचल्यानंतरही संजय
बुलढाणा: बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी काल (शनिवारी) पोलिसांवर टीका करताना आक्षेपार्ह भाषा वापरली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावरती नाराजी व्यक्त करत त्यांची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्याकडे केली होती. त्यावरून एकनाथ शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांना समज दिला होता. आज माध्यमांशी बोलताना आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, माझ्या व्यक्तिगत अनुभवावरून वक्तव्य केलं असून मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचंही ते म्हणाले आहेत.
पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावर मी पोलिसांची दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हणत आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी वक्तव्यावर ठाम आहे. मात्र, पोलिसांची दिलगिरी व्यक्त केल्याचं म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली, हेही मला एकनाथ शिंदे यांनी सांगितलं असल्याचं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले होते संजय गायकवाड?
महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही. पोलिसांनी जर 50 लाख पकडले तर ते 50 हजार दाखवतात, असं विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केलं होतं. या वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. संजय गायकवाडांच्या या विधानानंतर विविध चर्चांना उधाण आले होते. अनेक राजकीय नेत्यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली. आता या संदर्भात संजय गायकवाड यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांनी फोनकरून समज दिल्याची माहिती समोर आली आहे.
शिंदेंनी गायकवाड यांच्यावर तीव्र शब्दात नाराजी केली व्यक्त
पोलिसांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांच्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. अशा पध्दतीची आक्षेपार्ह विधानं लोकप्रतिनधींच्या तोंडी शोभत नाही. त्यामुळे यापुढे बोलताना काळजी घ्या, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांना समज दिली आहे. काही पोलिसांनी आक्षेपार्ह वर्तन केले म्हणून संपूर्ण पोलीस यंत्रणेला दोष देणं अत्यंत चुकीचं आहे. महाराष्ट्र पोलीस दल हे त्याग आणि शौर्याचं प्रतिक आहे. 26/11चा हल्ला असो किंवा राज्यातील कायदा सुव्यवस्था राखणे असो…पोलीस दल आहे म्हणून आपण सर्वजण सुरक्षित आहोत. पोलीस सर्वकाही विसरून रात्रंदिवस काम करतात, म्हणून आपण आनंदाने सण-उत्सव साजरे करू शकतो, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
सरसकट पोलिसांना दोषी ठरवणं अत्यंत चूकीचं- एकनाथ शिंदे
तुमच्या काही पोलिसांबद्दल तक्रारी असतील तर तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे किंवा माझ्याकडे दाद मागू शकता, असं एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांना सांगितले. मीडीयासमोर जाऊन सरसकट पोलिसांना दोषी ठरवणं अत्यंत चूकीचं आहे. लोकप्रतिनिधींना अशा पध्दतीनं बोलणं मुळीच शोभत नाही. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होते. पोलिसांचं खच्चीकरणही होऊ शकतं. वर्दीचा मान प्रत्येकाने राखलाच पाहिजे. त्यामुळे यापुढे अशा पध्दतीने विधानं होणार नाहीत याची काळजी घ्या, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाडांना बजावले आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.