Sanjay Raut PC | औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारची सुरक्षा, मग नाटकं कशाकरता, राऊतांची भाजपवर टीका
Sanjay Raut PC | औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारची सुरक्षा, मग नाटकं कशाकरता, राऊतांची भाजपवर टीका
हे देखील वाचा
पुणे: बीड जिल्ह्यात आवादा कंपनीकडून खंडणी मागणारा आणि संतोष देशमुख यांची हत्या घडवून आणणारा ‘आकाचा आका’ तो एकच व्यक्ती आहे. ही व्यक्ती संतोष देशमुख यांची हत्या होत असताना फोनवरुन विकृतपणे या सगळ्याची मजा घेत होती, असा गौप्यस्फोट शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (सुप्रिया सुले) यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या रविवारी पार पडलेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. सुप्रिया सुळे यांची या बैठकीतील ऑफ द रेकॉर्ड भाषणाची ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यामध्ये सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, मला मिळालेल्या माहितीनुसार आणखी एक रिपोर्ट बाहेर आला आहे. त्यानुसार मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण होत असताना तिकडे एका व्यक्तीने फोन केला होता. ही व्यक्ती त्यांची गम्मत बघत होते. किती ही विकृती? हे वास्तव आहे. ही व्यक्ती खंडणी, सत्ता आणि पैशांच्या जीवावर हे सगळे करत होती. एका गृहस्थाने केंद्र सरकारला तीन पत्र पाठवली होती. आवादा कंपनी वाईट आहे, त्यांच्याकडे चांगले काम होत नाही, त्यांना बीडमधून काढून टाका, अशी मागणी या व्यक्तीने केंद्राला पाठवलेल्या पत्रात केली होती. खंडणी मागणारा तोच, आवादाला हद्दपार करण्यासाठी पत्र लिहणारा तोच आणि संतोष देशमुख यांच्या हत्येमागे असणारा ‘आकाचा आका’ही तोच. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रासमोर आल्या आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
Comments are closed.