विरोधकांनी षडयंत्र केलं, हिंदुत्वासाठी काम करणार, झालेल्या चुकांची माफी मागते: पूजा जाधव
पुणे : पूजा जाधव हिनं पुणे महानगरपालिका वॉर्ड क्रमांक 2 मधून माघार घेतली आहे. भाजपकडून प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावरुन जोरदार टीका करण्यात आली होती. त्यामुळं पूजा जाधव हिनं अर्ज मागं घेतला. त्यानंतर पुण्यात पत्रकार परिषद घेत तिनं भूमिका स्पष्ट केली. विरोधकांनी षडयंत्र केलं, त्याची बळी ठरले, असंही पूजा जाधवनं म्हटलं. मी स्वतः हिंदू आहे, हिंदुत्वासाठी काम करेल. आतापर्यंत झालेल्या चुकांबद्दल माफी मागते, जिथे भाजपला गरज आहे तिथं काम करणार आहे. वाघीण जखमी झाल्यावर ती अजून जोरात काम करते, असं पूजा जाधव हिने म्हटलं.
पूजा जाधव पत्रकार परिषदेत रडल्या
आजचा हा दिवस माझ्यासाठी खूप अवघड दिवस आहे. मला गेल्या दहा ते बारा वर्षाचा संघर्ष आठवतो. बीडच्या गेवराई तालुक्यातील गावात जन्म झाला. माझे वडील ग्रामपंचायतीचे सरपंच देखील नाहीत. शेतकऱ्यांसाठी काम केल्यानं वयाच्या 21 व्या वर्षी पंचायत समिती म्हणून काम केलं. शेतकऱ्यांसाठी आयुष्य झोकून दिले, माझ्यावर पाच गुन्हे दाखल झाले. प्रत्येक कार्यकर्त्याच्या आयुष्यात हे होत नाही. महिलांचा, शेतकऱ्यांचा, शेतकऱ्यांच्या लाठ्या काठ्या खाल्ल्या. गुन्हे दाखल व्हायचे तेव्हा पोलीस स्टेशनला पाच सहा तास, दोन दोन दिवस झोपलेले. वकिलांचे फी भरण्यासाठी पैसे नसायचे. संघर्ष करत राहिले, असं म्हणत पूजा जाधव पत्रकार परिषदेत रडू लागल्या.
छत्रपती संभाजीराजे यांच्या मराठा क्रांती मोर्चामध्ये काम करत असताना त्यांनी एकत्र आणलं आणि लग्न झालं. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी बाहेर पडले आणि प्रभागासाठी काम करायला लागले. शेतकरी विरुद्ध कारखानदार असा संघर्ष केला. लग्नानंतर 20 ते 23 दिवसानंतर काश्मीर गेलेलो होते, तिथं हल्ला झालेला होता.रक्तात चळवळ होती, संघर्ष होता आम्ही घरातून बाहेर पडलो, महाराष्ट्रातील लोकांना बाहेर काढलं,देवेंद्र फडणवीस यांना व्हिडिओ कॉल केलेला. व्हायरल झालेला व्हिडिओ ती एका तासात दिलेली प्रतिक्रिया होती. दहशतवाद्यांना आपल्या देशात हिंदू-मुस्लीम करायचं होतं. तीन तासानंतर वातावरण बदललं होतं, त्यानंतर प्रतिक्रिया आल्या खरंच त्यांना धर्म विचारुन मारल्याचं समोर आलं, हे देखील सांगितलं होतं, पण ते लोकांपर्यंत गेलं नाही. पक्षाच्या वरच्या लेव्हलला मोठ्या मोठ्या घडामोडी घडत असतात त्याचं विक्टीम झाले. पहलगाम आणि काश्मीरचा हल्ला धर्म विचारुन झालेला आहे हे सांगितलं होतं. मात्र, ते खालीपर्यंत पोहोचू शकले नाही, असं पूजा जाधव हिनं म्हटलं.
प्रभाग क्रमांक 1 आणि 2 ची तयारी करत असताना सामान्य घरची मुलं उमेदवारी आणतात हे अनेकांना सहन होत नाही.विरोधकांची प्रभागाची टीम आहे. त्याची विक्टिम मी बनत आहे. राहुल गांधीचा वीडियो व्हायरल होतोय. तेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन मी राहुल गांधीकडे घेऊन गेले होते, असंही पूजा जाधव म्हणाली.
विरोधकांनी हे षडयंत्र केल आहे.माझ्या पतीला देव मानून आणि सगळं ऐकून त्यांचे आभार मानते, भाजपचे आभार मानते. ८/१० च्या खोलीत धनंजय जाधव मोठे झाले आहेत. सामान्य माणसाचा बळी घेतला जातो. पोस्ट टाकून मुलीचं आयुष्य वाया घालवलं जातं. मी भाजपमध्ये काम केलं संघ परिवाराने मला समजू घेतले. मी स्वतः हिंदू आहे. हिदुत्वासाठी काम करेल, झालेल्या चुकांबद्दल माफी मागते, असं पूजा जाधव हिनं म्हटलं. जिथे भाजपला गरज आहे तिथं काम करते. वाघीण जखमी झाल्यावर ती अजून जोरात काम करते, असं पूजा जाधव हिनं म्हटलं. राजकीय आयुष्य आपल्या दोघांच आहे. माझ्यामुळे तुमच्या राजकीय जीवन मागे गेलं असेल तर मला माफ करा, असं म्हणज पूजा जाधव हिनं धनंजय जाधव हिची माफी मागितली. निवडणुकीतून सर्व अर्ज मागं घेतल्याचं देखील पूजा जाधव हिनं सांगितलं.
धनंजय जाधव काय म्हणाले?
आमच्या दोघांचा विवाह झाला, आमच्या दोघांची पक्षीय भूमिका तुम्ही सर्वांनी पाहिली. माझा संघर्ष टू व्हीलरपासून इथंपर्यंत आहे. आम्ही प्रत्येक भूमिकेशी प्रामाणिक राहिलो आहे. सोशल मीडियाचा बळी माझी पत्नी ठरली आहे. माझ्या पत्नीचे शब्द नव्हते, ते तिच्या तोंडात घातले गेले. आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या आरक्षण मागतोय, तुमची बायको नाही हे स्टेटमेंट पूजा जाधव हिचं नव्हतं, असं धनंजय जाधव म्हणाले.
पहलगामच्या प्रकरणात तिनं चुकीचं केलं नाही हे ती सांगेल. कार्यकर्त्यानं ठरवलं तर काय करु शकतो हे 2026 च्या निवडणुकीतून पुणे शहरातून दाखवून दिलं आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये तयारी केली, तिथल्या माता भगिनी, भाऊ आलेले आहेत. कोणत्याही पक्षाच्या सर्व्हेत आम्ही प्लस होतो. तिथं काय समीकरणं झाली, निष्ठावताला संधी दिली, त्याचा आम्ही स्वीकार केला. प्रभाग क्रमांक 1 च्या नागरिकांची माफी मागतो. सुहास चव्हाण, आदिती बाबर यांची माफी मागतो, असं धनंजय जाधव यांनी म्हटलं.
आणखी वाचा
Comments are closed.