मला छोटं करू नका, टोमण्यांचे उत्तर द्यायला लावू नका; प्रफुल्ल पटेलांनी उडविली रोहित पवारांची खि

रोहित पवार धूळ वर पटेल: मंडल यात्रेनिमित्त भंडाऱ्यात आलेल्या आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत वक्तव्य केलं होतं. जर, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपची (BJP) साथ सोडली आणि ते पुरोगामी विचार स्वीकारून शरद पवारांच्या (Sharad Pawar) नेतृत्वात यायला तयार असतील, तर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येतील, असं वक्तव्य त्यांनी केले होते. आता रोहित पवार यांच्या वक्तव्याची राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी खिल्ली उडवली आहे.

प्रफुल्ल पटेलांनी उडविली रोहित पवारांची खिल्ली

प्रफुल्ल पटेल यांनी कोणाच्या वक्तव्यावर मला उत्तर द्यायला लावता. मला छोटं करू नका, असं वक्तव्य करून त्यांनी रोहित पवारांची खिल्ली उडविली. यासोबतच अनिल तटकरे हे महाराष्ट्रातले आणि कोकणातले जेष्ठ नेते आहेत. त्यांना इतक्या वर्षाचा अनुभव आहे. 40-40 वर्ष ज्या लोकांनी राजकारणात घालवले. त्यांना या नवीन लोकांच्या काही टोमण्यांचे उत्तर द्यायला लावता. आमचे पण काही स्टॅंडिंग आहे, असा टोला देखील प्रफुल पटेल यांनी रोहित पवारांना लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले होते रोहित पवार?

रोहित पवार यांनी म्हटले होते की, आम्ही भाजपाच्या विरोधात आहोत, भाजपच्या विचारसरणीच्या विरोधात आहोत. त्यामुळे जर अजित पवारांनी भाजपची साथ सोडली आणि शरद पवार साहेबांसोबत पुरोगामी विचारासोबत ते आले तर आम्ही त्यांचा विचार करू. मात्र, अजित पवार भाजपसोबत असतील तर आम्ही एकत्र येऊच शकत नाही. जर त्यांनी भाजपला सोडलं तर सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आपण काय करायचं तो विचार केला जाईल, असे त्यांनी म्हटले होते.

दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी काहीही फरक पडणार नाही

दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येऊन आगामी निवडणुका लढतील आणि कुठलीही अघोरी शक्ती त्यांना पराभूत करणार नाही, असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. याबाबत विचारले असता प्रफुल्ल पटेल म्हणाले की, उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे बाळासाहेब असताना शिवसेनेत एकत्रच होते. वेगळे झाल्यानंतर आता एकत्र आले तर, काय फरक पडणार आहे. एकनाथ शिंदे शिवसेना वेगळी करून लढलेत आज त्यांच्यासोबत अनेक आमदार आहेत आणि परत ते निवडून आलेले आहेत. आता ते दोन एकत्र आले की, वेगळे राहिले तरी काही फरक पडत नाही. जी शिवसेनेची ताकद आहे ती एकनाथ शिंदेंकडे आहे. मुंबई महानगरपालिकेतील 90 पेक्षा अधिक जे नगरसेवक आहे ते एकनाथ शिंदे सोबत आलेले आहेत. जे काही होईल ते मतपेटीच्या माध्यमातून लोकांसमोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Rohit Pawar: ‘शेतकऱ्याला मारलं आणि तुम्ही ‘त्या’ नेत्याची पुन्हा नियुक्ती करत आहात’, रोहित पवारांचा अजितदादांना काळजीपोटी सवाल

आणखी वाचा

Comments are closed.