तळोजावासीयांच्या प्रश्नांना वाचा फोडणार, प्रगती पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे लोकार्पण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाविकास आघाडीच्या पनवेल महापालिकेतील नगरसेविका प्रगती पाटील यांनी तळोजा येथे सुरू केलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना नेते, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते झाले. या जनसंपर्क कार्यालयामुळे तळोजावासीयांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यास मदत होईल, असा विश्वास अनंत गीते यांनी व्यक्त केला. जनसंपर्क कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याला शिवसैनिकांसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तळोजा येथील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि विविध शासकीय व महापालिकेच्या कामांमध्ये त्यांना मदत करण्यासाठी नगरसेविका प्रगती पाटील आणि त्यांचे पती कैलास पाटील यांनी जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना नेते अनंत गीते यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शिवसेना उपनेते बबन पाटील, मावळ लोकसभा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख दीपक निकम, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील आदी उपस्थित होते.

नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले हे कार्यालय परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे, असे यावेळी अनंत गीते यांनी स्पष्ट केले.

वारसा समर्थपणे पुढे सुरू

रायगड जिल्ह्यात बबन पाटील यांनी राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा मोठा ठसा उमटवला आहे. त्यांचा हा समाजसेवेचा वारसा प्रगती पाटील आणि कैलास पाटील हे समर्थपणे पुढे नेत आहेत. या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांच्या केवळ समस्या आणि अडचणी सुटणार नाहीत, तर पाटील कुटुंबाच्या समाजसेवेला बळ मिळणार आहे, असे प्रतिपादन यावेळी अनंत गीते यांनी केले.

Comments are closed.