गोकुळच्या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जाऊ, मंत्री प्रकाश आबीटकरांचं वक्तव्य
प्रकाश आबिटकर: कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व निवडणुका यापूर्वी महायुती म्हणून लढवल्या आहेत, त्यामुळं गोकुळची निवडणूक सुद्धा महायुती म्हणूनच लढवली जाईल, असं वक्तव्य आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलं आहे. असाच मतप्रवाह जिल्ह्यातील आणि राज्यातील नेत्यांचा आहे. पुढच्या आठवड्याभरात पात्र अपात्र संस्थांची यादी येईल, संस्थांचा निकाल लागेल आणि यानंतरच आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाऊ असेही आबीटकर म्हणाले. गोकुळची निवडणूक अजून सुरु व्हायची आहे, ज्या लोकांकडून अशा अॅक्टिव्हिटीज सुरू असतात त्याचा तो भाग असेल. अदृश्य शक्ती बद्दल जे बोलले असतील त्यांनाच त्याची कल्पना असेल असे आबीटकर म्हणाले. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
लोकांनी नतमस्तक कोणासमोर व्हावं तर देवासमोर व्हावं
माजी सर्वांना विनंती आहे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आमचा सर्वांशी संपर्क येतो, अनेक लोक आपल्याला संपर्क करत असतात, याचा अर्थ त्या घटनाक्रमाशी आमचा संबंध जोडणे चुकीचं आहे. फोटो काढण्यासाठी नमस्कार करण्यासाठी आग्रह धरतात त्यांच्या भावना दुखवू शकत नाही अस आबीटकर म्हणाले. कालच मी माध्यमांना सांगितलं आहे की, असे अनेक अशोक खरात आहेत ज्यांच्यापासून लोकप्रतिनिधी, माध्यमांनी सावध राहिले पाहिजे. लोकांनी नतमस्तक कोणासमोर व्हावं तर देवासमोर व्हावं, देवाचा अवतार असल्याचा भास करणाऱ्या माणसासमोर काय करावे याच्या संबंधीची स्पष्टता घ्यायला हवी अनेक लोकप्रतिनिधी म्हणून संपर्कात येत असतात, त्यातलाच हा भाग असेल अनेक लोकांना भेटणारा अनाथांचा नाथ अशी एकनाथ शिंदे यांची प्रतिमा आहे, चुकीच्या गोष्टीच्या समर्थन उपमुख्यमंत्री शिंदे कधीच करणार नाहीत असे आबीटकर म्हणाले.
अशोक खरात संबंधी चौकशी सुरू आहे यात कठोर कारवाई केली जाईल, आता याला फाटे फोडण्यात अर्थ नाही, या प्रकरणात गोळ्या देणाऱ्यांवर ही कारवाई होणार आहे, जे चुकीचे असेल त्यावर नक्कीच कारवाई होईल असे आबीटकर म्हणाले. गर्भलिंग निदान कायद्यासंदर्भात देखील आबीटकर यांनी प्रतिक्रिया दिली. गेल्या वर्षभरामध्ये पीसीबी एनडीटी कायद्यात ज्याप्रमाणे सुधारणा केल्या, खबरी आणि टी क्व़ायसाठी एक लाख रुपये वाढवले, पूर्वी दहा हजार मिळत नव्हते. काल सुद्धा राज्याच्या सभागृहात याबाबत चर्चा झाली, ज्या हॉस्पिटलने यात भाग घेतला त्यांना डी रजिस्टर करण्याचा निर्णय घेतला आहे. गर्भलिंग निदान करणाऱ्या हॉस्पिटलची डॉक्टरची आम्ही गैर करणार नाही, असे प्रकार करणाऱ्या हॉस्पिटल आणि डॉक्टरवर मकोका कारवाई करता येईल का याचाही शासन गंभीरपणे विचार करत आहे. राज्यात पीसीबी एनडीटी ॲक्ट कठोरपणे राबवणे सरकारची जबाबदारी आहे, पुढच्या काळात याचं कामकाज दिसेल असे आबीटकर म्हणाले.
बिद्री गर्भलिंग निदान प्रकरणावर देखील आबीटकरांनी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणात सर्वांवर कठोर कारवाई होणार आहे, नियमावली आहे त्याप्रमाणे काम होईल, यात सहभागी व्यक्तींवरही कारवाई होणार आहे अशा प्रकरणात प्रबोधनाची गरज आहे. तालुका आणि जिल्हास्तरावरील सर्व कमिटीच्या मी बैठक घेत आहे, त्यामुळे या प्रकरणांना गती येईल, राज्यात अशा घटना घडल्यानंतर पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत आहे असे ते म्हणाले.
आणखी वाचा
Comments are closed.