इकडे भाजप नगरसेवकाची पोलिसांत तक्रार,तिकडे प्रसाद वेदपाठक मनसेच्या सर्वात डॅशिंग नेत्याला भेटला
प्रसाद वेदपाठक व्हाईट लाइन विवाद: घाटकोपरमधल्या (Ghatkoper) सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) आणि युट्यूबर असलेल्या प्रसाद वेदपाठकच्या (Prasad Vedpathak) राहत्या सोसायटीत जैन साध्वींसाठी पांढरी पट्टी (Prasad Vedpathak White Line Row) काढण्यात आली. याच पट्टीवरुन प्रसाद वेदपाठक (Influencer Prasad Vedpathak) यानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत जाब विचारलेला. तसेच, स्वतःसोबत आपली पत्नी आणि आईच्या धार्मिक भावना दुखावल्याचा दावाही त्यानं केलेला. प्रसादचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि हे प्रकरण चर्चेत आलं. त्यानंतर बऱ्याच मतमतांतरानंतर सोसायटीतील ज्या जैन कुटुंबानं (Jain Family) पांढरी पट्टी काढलेली, ती पट्टी हटवण्यात आली. त्यानंतर मनसेनं हा मुद्दा लावून धरलेला. तसेच, काही दिवसांपूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट केलेलं. ते म्हणालेले की, “पांढरी पटी मारून सांस्कृतिक दहशतवाद परसवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची या पुढे तोंड काळी करण्यात येतील…”
अशातच आता प्रसाद वेदपाठक यानं मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. तसेच, मनसे नेते अविनाश जाधव, मनसे नेते संदीप देशपांडे यांचे आभार मानले आहेत.
प्रसाद वेदपाठककडून सोशल मीडियावर अविनाश जाधव यांच्यासोबतचा फोटो शेअर (Prasad Vedpathak Share Photo With Avinash Vedpathak)
प्रसाद वेदपाठक यानं सोशल मीडियावर मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. प्रसाद वेदपाठक यानं अविनाश जाधव यांची भेट घेतली असून सोसायटीतील पांढऱ्या पट्टीच्या मुद्द्यावर दिलेल्या पाठिंब्यांसाठी आभार मानले आहेत.
धन्यवाद @avinash_mns पूर्ण पाठिंबा आणि प्रेम दाखवल्याबद्दल… सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही आम्हाला पंच्या 😍 म्हंटले होते @mnsadhikrut धन्यवाद @संदीपदादरMNS
मनःपूर्वक धन्यवाद तुमच्या प्रेमासाठी आणि खंबीर पाठिंब्यासाठी. ❤️
सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे तुम्ही आम्हाला प्रेमाने “पंछा” म्हणून… pic.twitter.com/jRp6SNmHrT— प्रसाद वेदपाठक (@prasadvedpathak) 12 जून 2026
प्रसाद वेदपाठक यानं सोशल मीडियावर अविनाश जाधव यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट करत लिहिलंय की, “मनःपूर्वक धन्यवाद तुमच्या प्रेमासाठी आणि खंबीर पाठिंब्यासाठी. सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे, तुम्ही आम्हाला प्रेमाने ‘पंछा’ म्हणून हाक मारलीत, तसेच MNS Adhikrut आणि Sandeep Deshpande साहेब, तुमच्या पाठिंब्यासाठी आणि शुभेच्छांसाठी मनापासून आभार…”
प्रसाद वेदपाठकच्या सोसायटीतला पांढऱ्या पट्टीचा वाद नेमका काय? (Prasad Vedpathak White Line Controversy)
प्रसाद वेदपाठक याच्या सोसायटीत काही जैन समाजातील लोकांनी ही पांढऱ्या रंगाची पट्टी मारलेली. यावर प्रसाद वेदपाठक यानं प्रश्न उपस्थित करत आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचं म्हटलं होतं. तसेच, आपल्या सोसायटीच्या आवारात अशी पांढरी पट्टी मारण्यात आली, त्यावेळी आपली परवानगी कुणीच घेतलेली नाही, असा दावाही प्रसाद वेदपाठक यानं केलेला. प्रसाद वेदपाठक यानं दिलेल्या माहितीनुसार, जैन धर्मगुरूंसाठी ही पट्टी मारण्यात आलेली. धार्मिक मान्यता पाळायच्या असतील तर त्या घरी पाळाव्यात सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या कृत्यावर प्रसादनं आक्षेप नोंदवलेला. तसेच, हा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, त्यामळे ही पट्टी लवकरात लवकर हटवावी, अशी मागणीही प्रसाद वेदपाठक यानं केलेली. त्यानंतर आता त्या पांढऱ्या पट्टीवर रंगकाम करून पट्टी हटवण्यात आल्याचंही प्रसाद वेदपाठकनं व्हिडीओ शेअर करुन सांगितलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
एबीपी माझाच्या बातम्या LIVE :
अर्जुन तेंडुलकर वेड्स सानिया चंधोक : अर्जुन-सानिया लग्नबंधात! स्टायलिश लुकिंग चष्म्यासह लक्ष्य ठेवा
Comments are closed.