बिल्डिंगमधील जैनांशी पंगा, पांढरी पट्टी हटवणं प्रसाद वेदपाठकला महागात पडलं; आधी इन्स्टा अकाऊंट

प्रसाद वेदपाठक यांच्यावर भाजप नगरसेवक प्रवीण छेडा : गेल्या काही दिवसांपासून घाटकोपरच्या (Ghatkopar News) सोसायटीतील पांढऱ्या पट्टीचा वाद चर्चेत आलेला. घाटकोपरमधल्या सोसायटीत राहणाऱ्या एका जैन कुटुंबानं (Jain Family) जैन साध्वींसाठी इमारतीच्या आवारात पांढरी पट्टी मारलेली. प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer), कंटेंट क्रिएटर (Content Creator) आणि युट्यूबर प्रसाद वेदपाठक (YouTuber Prasad Vedpathak) यानं हा मुद्दा समोर आणला आणि आक्षेप व्यक्त केला. स्वतः राहत असलेल्या सोसायटीत मारलेल्या पांढऱ्या पट्ट्यामुळे (Prasad Vedpathak White Line Controvercy)  त्याच्यासह त्याची पत्नी आणि आईच्या धार्मिक भावना दुखावल्याचा दावा  इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यानं केलेला. त्यानंतर अनेक दिवसांनी पांढरी पट्टी हटवण्यात आली आणि प्रसाद वेदपाठकनं यासंदर्भात सोशल मीडियावर “माझ्यासाठी हा प्रश्न संपला…”, अशा आशयाची पोस्ट करुन पांढरी पट्टी हटवल्याचा व्हिडीओ शेअर केला. पण, आपल्याकडून विषय संपलाय असं प्रसाद जाहीर केल्यानंतर आता त्याच्याविरोधात सोशल मीडियावर रोष पाहायला मिळतोय. तसेच, या प्रकरणामुळे प्रसाद वेदपाठकच्या अडचणींतही वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय.

इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर प्रसाद वेदपाठक विरोधात जैन धर्मीय आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. तसेच, आता एका भाजप नगरसेवकानंही प्रसाद वेदपाठकनं घेतलेल्या भूमिकेवर आक्षेप नोंदवत या प्रकरणाविरोधात पोलिसांत धाव घेतली आहे. भाजप नगरसेवक प्रवीण छेडा (BJP Corporator Pravin Chheda) यांनी प्रसाद वेदपाठक विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. संबंधित वक्तव्यामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ शकतो, असा आरोप करत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

भाजप नगरसेवकाची प्रसाद वेदपाठक विरोधात पोलिसांत धाव (BJP Corporator Allegation On Prasad Vedpathak)

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांनी त्यांच्या सोसायटी परिसरात मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीविरोधात नाराजी व्यक्त करत पोस्ट केली आणि त्याच पोस्टमुळे नवा वाद निर्माण झाला. या पोस्टमध्ये ‘जैन जिहाद’ असा उल्लेख केल्याचा आरोप करत जैन समाज आणि भाजप नगरसेवक प्रवीण छेडा यांनी पोलीस उपायुक्त यांची भेट घेऊन वेदपाठक यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

भाजप नगरसेवक प्रवीण छेडा या प्रकरणावर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “माझी तक्रार प्रसाद वेदपाठक यांनी जे ट्वीट केलंय, ‘जैन जिहाद’ म्हणून त्याविरोधात आहे. त्यामध्ये त्यांनी असंही म्हटलंय की, आय एम ए विक्टिम ऑफ ए जैन कम्युनिटी असं म्हटलंय. म्हणजे, जैन लोकांना त्यानं जे जिहादी म्हणून संबोधित केलंय, त्याला माझा विरोध आहे. त्यासोबतच त्यांनी जे पांढऱ्या पट्टीचा मुद्दा घेऊन संपूर्ण मुंबई शहर आणि महाराष्ट्रभरात इन्फुएन्स वाढवण्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या व्यक्तीनं केलंय, यालाच माझा आक्षेप आहे.”

पुढे बोलताना नगरसेवक प्रवीण छेडा म्हणाले की, “जैन धर्म हा फक्त गुजराती-मारवाड्यांचा नाही, मराठी लोकांमध्येही जैन धर्म मानणारे लोक आहेत, शिख समुदायामध्येही जैन धर्माला मानणारे लोक आहे. खरं तर हिंदुंच्या विरोधात हा माणूस काम करतोय, त्यांचं जर चॅनल वैगरे आपण पाहिलं तर, त्यामध्ये तो घरी कुराण करतो आणि काय करतो… त्याहीपुढे जाऊन हा माणूस लिहितो की, मी गणपतीला मानत नाही… आपण सगळे कॅन्सरसारखे आहोत… सगळ्या समुदायाला जर तो कॅन्सर मानत असेल, जो दोन धर्मांत तेढ निर्माण करत असेल, त्याच्याविरोधात सक्त कारवाई झालीच पाहिजे…”

भाजप नगरसेवक प्रवीण छेडा यांची प्रसाद वेदपाठकवर आरोप करणारी पोस्ट (BJP Corporator Pravin Chheda Post On Prasad Vedpathak)

भाजप नगरसेवक प्रवीण छेडा यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरही यासंदर्भात पोस्ट केलीय. त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की, “एकतेसाठी एकत्र या: घाटकोपरमधील शांतता भंग करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल… घाटकोपर हे नेहमीच शांततापूर्ण सहजीवनाचे प्रतीक राहिले आहे. अलीकडच्या काळात जातीय तणाव निर्माण करण्याच्या काही समाजकंटकांच्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी… नगरसेवक प्रवीण छेडा यांनी आज डीसीपी (पूर्व विभाग – 2) यांची भेट घेतली आणि प्रसाद वेदपाठक याच्याविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. आरोपीने नुकतेच सोशल मीडियावर धार्मिक प्रथांची बदनामी केली होती. अनवाणी चालणाऱ्या जैन साधूंच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यांवर मारलेल्या पांढऱ्या पट्ट्यांचा चुकीचा अर्थ लावून, त्याने जाणीवपूर्वक त्याला ‘जैन जिहाद’ असे चुकीचे आणि आक्षेपार्ह नाव दिले. अफवा आणि द्वेषयुक्त भाषणाला आपल्या समाजात स्थान नाही. स्थानिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर मुंबई पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी आम्ही विनंती करतो…”

प्रसाद वेदपाठक इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड

पांढरी पट्टी हटवल्याच्या प्रसाद वेदपाठकच्या पोस्टवर आता काही जैन धर्मीय आक्रमक होत वादग्रस्त पोस्ट करत आहेत. तसेच, काही दिवसांपूर्वीच प्रसादनं काही जैन धर्मीय माझ्या अकाउंटवर मास रिपोर्टींग करत असल्याचा दावाही केलेला. याचाच परिणाम म्हणून की, काय… आता प्रसाद वेदपाठकचं इन्स्टा अकाउंट सस्पेन्ड करण्यात आलं आहे. अकाउंट सस्पेन्ड करण्यात आल्याचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केलाय. यामध्ये प्रसादनं जे योग्य आहे ते बोलल्यानंतर हे तुम्हाला मिळतं असं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

‘मराठी माणसाला दाखवून द्या, मुंबईवर आपलं वर्चस्व, आपणच इथले सर्वेसर्वा…’; प्रसाद वेदपाठकच्या ट्विटवर रिप्लाय, वादग्रस्त पोस्ट व्हायरल

एबीपी माझाच्या बातम्या LIVE:

Comments are closed.